कोकण

तळेरे, दारिस्ते, घोणसरीत तीन जागांसाठी निवडणूक

CD

लोगो - कणकवली तालुका ग्रामपंचायत निवडणूक
--
तळेरे, दारिस्ते, घोणसरीत
तीन जागांसाठी निवडणूक

२८ला मतदान, ११ जागा बिनविरोध

कणकवली, ता. १८ : तालुक्‍यातील तळेरे, दारिस्ते आणि घोणसरी येथील प्रत्‍येकी एका जागेसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ११ जागा बिनविरोध ठरल्‍या आहेत. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या ११ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या ठिकाणचे उमेदवार बिनविरोध ठरले.
यामध्ये कासार्डे प्रभाग २ मधून शितल शेट्ये, कळसुली प्रभाग ३ मधून प्रांजल घाडीगावकर, पिसेकामते प्रभाग ३ मधून देवेंद्र सावंत, हुंबरठ प्रभाग १ मधून मनिषा जाधव, हळवल प्रभाग ३ मधून गौरी परब, तळेरे प्रभाग १ मधून निलम वाडये, तळेरे प्रभाग २ मधून प्राची चव्हाण, डामरे प्रभाग १ मधून भाग्यश्री सावंत, कलमठ प्रभाग ३ मधून मृण्मयी जाधव, आयनल प्रभाग १ मधून अशोक मगम आणि वारगाव प्रभाग १ मधून महेंद्र केसरकर यांचा समावेश आहे.
दारिस्ते ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रीती कदम, सिद्धी गुरव व पूजा गुरव यांनी अर्ज दाखल केले होते. पैकी सिद्धी गुरव यांनी अर्ज मागे घेतल्याने आता प्रीती कदम व पूजा गुरव यांच्यात लढत होणार आहे. तळेरे ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी सागर डंबे, उद्धव महाडिक आणि आदित्य महाडिक यांनी अर्ज भरले होते. पैकी उद्धव महाडिक यांनी माघार घेतल्याने सागर डंबे व आदित्य महाडिक यांच्यात सामना रंगणार आहे. साकेडी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण महिला जागेसाठी ऋतुजा सदडेकर व साक्षी घाडी यांनी अर्ज भरले होते. ऋतुजा सदडेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने साक्षी घाडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. घोणसरी सरपंचपदासाठी राजेंद्र राणे, अनंत गुरव व प्रसाद राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी राजेंद्र राणे यांनी अर्ज मागे घेतल्याने अनंत गुरव व प्रसाद राणे यांच्यात थेट लढत होणार आहे.
तालुक्यातील या तीन ठिकाणी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT