कोकण

अणाव येथे आढळले दुर्मीळ खवले मांजर

CD

38176

अणाव येथे आढळले
दुर्मीळ खवले मांजर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः तालुक्यातील अणाव-बामणवाडी येथील अजित अणावकर यांच्या घराशेजारी शुक्रवारी (ता. १७) रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुर्मीळ खवले मांजर आढळून आले. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
घराशेजारी खवले मांजर असल्याची माहिती अणावकर यांनी कसाल वनपाल यांना दिली. कडावल वन क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागातील कर्मचारी प्रकाश शिंदे, प्रियांका पाटील, वनरक्षक (कसाल) उत्तम कांबळे, पंकज घाडी, उदय परब, प्रशांत जाधव, प्रवीण पवार, बाबुराव कांबळे, शिपाई सुनील आंगणे हे अणाव येथे दाखल झाले. त्यांना अजित अणावकर यांच्यासह ग्रामस्थ राजन जडये, विपुल हडकर, पार्थ अणावकर यांनी खवले मांजर पकडण्यासाठी मदत केली. वैद्यकीय तपासणीनंतर खवले मांजरास कडावल परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT