कोकण

एका खातेदाराच्या हमीपत्रावर भरपाई द्या

CD

38185

एका खातेदाराच्या हमीपत्रावर भरपाई द्या

शेतकरी संघटनेची मागणी; तुळस येथे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १८ ः सामाईक खातेदार व सातबाऱ्यावर सहहिस्सेदार असलेल्या शेतकऱ्यांना एका खातेदाराचे हमीपत्र गृहित धरून आंबा व काजू पिकांसाठी शासनाकडून देण्यात येणारी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटना व शेतकरी यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे करण्यात आली आहे.
तुळस येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या उपजिल्हाधिकारी वनिता पाटील यांच्याकडे हे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय व शेतकरी यांच्यामार्फत सादर करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत आंबा व काजूसाठी विमा भरताना चार हेक्टर मर्यादा ठेवण्यात आली असून, त्याच पद्धतीने आंबा चार हेक्टर क्षेत्र व काजू चार हेक्टर क्षेत्र अशी नुकसान भरपाईची मर्यादा असावी. कोणत्याही निकषाशिवाय आंबा व काजू नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्याच्या विविध योजना उपलब्ध असल्या तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निकषात बदल होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
शासनाने ‘विकसित भारत ग्रामीण आजीविका’ ही नवीन योजना सुरू केली असून, पूर्वी ‘रामजी’ व ‘एमआरजीएस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या योजनेत बदल केला आहे. मात्र, या योजनेत पूर्वीप्रमाणेच दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नसल्याने, इच्छुक असूनही ते वंचित राहात आहेत. गुरांसाठी गोठा, फळबाग लागवड, सिंचन विहीर अशा योजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे या योजनेची मर्यादा किमान पाच हेक्टरपर्यंत वाढवावी. याशिवाय, आंबा व काजू नुकसानभरपाई देताना शासनाने कोणतेही निकष न लावता गरजू व नुकसानग्रस्त गरीब शेतकरी वंचित राहणार नाहीत, याची कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

Hormuz Strait : होर्मुझ तणाव पेटला! भारतीय जहाजावर गोळीबारानंतर मोदी सरकारचा राग उफाळला; इराणी राजदूतांना समन्स

Senior Living Athashri: परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ला रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती; वडोदऱ्यात सहा हजाराव्या ज्येष्ठ रहिवाशाला घराचा ताबा

Satara Politics: पाटणच्या पाणीप्रश्नावरून शंभुराज देसाईंचा पाटणकरांना अप्रत्यक्ष टोला; ठेकेदार व अधिकाऱ्यांना तात्काळ कामाला लावण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT