38193
भरधाव दुचाकी एसटीखाली,
सतर्कतेमुळे चालक बचावला
कणकवली बसस्थानकासमोर घटना
कणकवली, ता. १८ : कणकवली बसस्थानकासमोरील मिडलकटवरून तळेरे ते कणकवलीच्या दिशेने जाणारी बस वळली अन् त्याच दरम्यान वेगाने येणारी दुचाकी बसखाली गेली. सुदैवाने दुचाकीस्वाराने उडी मारल्याने तो बचावला. दुपारी साडेबाराच्या सुमारास कणकवली बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली ही घटना घडली.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबाराच्या सुमारास एक दुचाकीस्वार मुंबई ते गोवा या दिशेने जात होता. त्याच्या पाठीमागून त्याच दिशेने कणकवली बसस्थानकात एसटी जात होती. बस स्थानकासमोरील मिडलकटवरून ही बस वळत असल्याचे दुचाकीस्वाराच्या लक्षात आले नाही. आपल्या पाठीमागून दुचाकीस्वार येत आहे, हे बस चालकाने पाहिले नाही. चालकाने स्थानकाच्या दिशेने बस वळवली, तर दुचाकीस्वार आपल्याच धुंदीत दुचाकी पुढे घेऊन चालला होता. अचानक बस वळल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकी सोडून उडी मारली. यात दुचाकी थेट बसखाली गेली.
या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एसटीच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हवालदार विनोद चव्हाण, वाहतूक पोलिस संदेश अबिटकर देखील घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर काही वेळाने दुचाकी बसच्या खालून बाहेर काढण्यात आली. दरम्यान, दुचाकीस्वार हा कनिष्ठ महाविद्यालयात जाणारा अल्पवयीन होता. त्याच्याकडे दुचाकी चालविण्याचा परवानाही नव्हता. राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटविण्यात आले. त्यामुळे या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद केलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.