कोकण

सुपारी उत्पादनाचा पर्यायाही घाटा

CD

सकाळ विशेष ---------लोगो
38352
rat१९p१.jpg-
३८२५७
राजापूर तालुक्यातील सुपारीची बाग.
rat१९p२.jpg-
३८२५८
ओली सुपारी
- rat१९p३.jpg-
३८२५९
सुपारी
-----------------

सुपारी उत्पादनाचा पर्यायही घाट्यात
निम्म्यापेक्षा जास्त घट ; शासनदरबारी उपेक्षित, खर्च वाढताच

इंट्रो

शासनाच्या महत्वाकांक्षी फळबाग लागवड योजनेचा फायदा घेत कोकणातील शेतकर्‍यांनी अनके आंबा-काजूच्या बागायती विकसित केल्या आहेत; मात्र, गेल्या दशकभरामध्ये सातत्याने वातावरणामध्ये झालेल्या बदलांचा आंबा-काजूला फटका बसत आहे. कीडरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च केला तरी, उत्पादनातील घट थांबताना दिसत नाही. हवामान बदलाचा कमी परिणाम होणाऱ्या आणि वर्षाकाठी दोनवेळा हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या सुपारी बागायतीकडे कोकणातील शेतकरी वळत आहे. मात्र सुपारीच्या उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. यांमुळे सुपारी बागायतदार मेटाकुटीस आले आहेत. सुपारीचे नुकसान शासनदरबारी उपेक्षितच राहिलेली आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर
-------------------

अतिवृष्टी अन् वादळांचा परिणाम

वादळे आणि अतिवृष्टीचा सुपारीवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सुपारीची झाडे सातत्याने जोरजोरात हेलकावे खातात. अतिवृष्टीमध्ये झाडांच्या मुळाच्या ठिकाणी निचरा होणारी जमीन नसल्यास तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे ती कमकुवत होतात. सुपारीच्या झाडाचे नुकसान दोन-तीन वर्षानंतर दिसून येते. झाड मरण्याचे प्रमाण वाढते. गेल्या चार-पाच वर्षामध्ये सातत्याने कोकण किनारपट्टीवर आलेली वादळे आणि अतिवृष्टीचा परिणाम आता दिसत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
-------------------

माकडांचा उपद्रव कायम

जंगलतोड आणि जंगलामध्ये पुरेसे न मिळणारे अन्न यामुळे माकडे मानवी वस्तीकडे वळले. घर परिसरातील नारळ, सुपारी बागांमध्ये माकडांचा वावर वाढला. गेल्या तीन चार वर्षामध्ये लाल तोंडाच्या माकडांचा त्रास सुपारीला होऊ लागला आहे. ही माकडे सुपारीचे फळ चावून सालातला रस खातात. तसेच रस शोषून घेणारी बुरशी, कोळींचा प्रादुर्भाव वाढून सुपारी परिपक्व होण्याअगोदरच गळून पडली. यावर्षी अधिक काळ झालेल्या वृष्टीमुळे बुरशी आणि कोळेरोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला. कीटकनाशक वा बुरशीनाशकांची फवारणी करता आली नाही. औधष पावसाच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे फळगळती पाऊस गेल्यानंतर वाढली. त्यामध्ये साधारणतः ८० टक्के फळगळती झाली.
----------------
शासनदरबारी उपेक्षित

गेल्या पाच वर्षामध्ये सुपारीचा दर दुप्पट झाला असून, सद्यःस्थितीमध्ये सरासरी ५०० ते ६०० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. हा दर समाधानकारक असला तरी, उत्पादन नसल्याने जादा दराचा बागायदारांना उत्पन्नाच्यादृष्टीने उपयोग होताना दिसत नाही. आंबा-काजू पिकाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळते. मात्र, नुकसान भरपाईच्या मापदंडामध्ये शासनदरबारी सुपारी पिकाच्या नशिबी उपेक्षाच राहिलेली आहे.
--------------

चौकट
दृष्टिक्षेपात रत्नागिरीतील सुपारी पीक

कोकण विभाग सुपारी क्षेत्र ः ५ हजार हेक्टर क्षेत्र
सुपारी उत्पादन ः पावणेपाच लाख मेट्रिक टन
कोकण विभागासाठी आवश्यक ७ लाख मेट्रिक टन
सरासरी वार्षिक उलाढाल २३ हजार ७५० कोटी रुपये
----------------
चौकट
सुपारीचे प्रकार

सुपारीचे मुख्य प्रकार ः स्पेशल मोहरा, मोहरा, सुपारी, वचरास, झिणी
मुख्य प्रकारातील वर्गवारी ः फटोर (तडा गेलेली), पासोडा (सुपारी सोलताना पांढरे साल चिकटलेली), खोका (खराब, काळी, कुजकी) .
निर्यात होणारा सुपारी प्रकार ः स्पेशल मोहरा, मोहरा निर्यात
-----------
चौकट ः २
दृष्टिक्षेपात सुपारीचे दर

वर्ष प्रतिकिलो दर (रुपये)

२०२१ २५०-३००
२०२२ ३००-३५०
२०२३ ३००-३७५
२०२४ ३५०-४००
२०२५ ४००-४५०
२०२६ ४५०-६००
-----------------
कोट
सुपारीला गेल्या काही वर्षामध्ये हवामानातील बदल आदींचा फटका बसून उत्पादन घटले आहे. त्यावर मात करण्यासाठी कीडरोग नियंत्रण, खते आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.जलस्रोत उपलब्ध असलेल्या ठिकाणी बहुपयोगी सुपारीच्या बागायती विकसित करून शेतकर्‍यांना उत्पन्न मिळवणे अन् वाढवणे शक्य आहे.
- डॉ. किरण मालशे, नारळ संशोधन केंद्र, रत्नागिरी
---------------
कोट
सुपारीवर गेल्या काही वर्षामध्ये किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. फळगळतीही आहे. बागायतीमधील कामांसाठी मजूरही उपलब्ध होत नाही. कमी उत्पादन, व्यवस्थापनावर होणारा वाढता खर्च; मात्र, त्या तुलनेमध्ये कमी उत्पन्न ही सुपारी बागायतदाराची व्यथा आहे.
- प्रकाश जोग, सुपारी बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

रहस्य, थरार आणि अंधश्रद्धेची प्रभावी गुंफण, कसा आहे पूजा सावंतचा ‘सालबर्डी?

SCROLL FOR NEXT