कोकण

पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव

CD

-rat१९p१७.jpg-
26O38363
पावस ः प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज असली तरी यंत्रसामग्री नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
---
पावस प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव
८५ वस्तूंची प्रतीक्षा कायम ; उद्‍घाटनानंतरही रुग्णांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २० ः पावस प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत सुरू होऊन तीन महिने उलटले तरी रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेल्या सुमारे ८५ वस्तू अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे सुसज्ज इमारत असूनही रुग्णांना मूलभूत सुविधांअभावी त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
पावस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्रांतील रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नव्या इमारतीची उभारणी करण्यात आली. रुग्णांच्या मागणीनुसार आरोग्यवर्धिनी केंद्राची सुसज्ज इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यावर रुग्णसेवा सुरू करण्यात आली. मात्र आवश्यक साधनसामग्री नसल्याने उद्‍घाटनानंतरही जवळपास महिनाभराने सेवा सुरू करण्यात आली.
इमारतीच्या पहिल्या मजल्यासाठी निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कामाला गती मिळाली नसल्याने बांधकाम अपूर्णच आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या कामकाजात अडचणी निर्माण होत असून रुग्णांना पुरेशा सुविधा देणे कठीण झाले आहे.
जानेवारी २०२६ मध्ये पावस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना आवश्यक ८५ वस्तूंची यादी लेखी स्वरूपात पाठवली होती. त्याला तीन महिने उलटूनही कोणतीही पूर्तता झालेली नाही.
---
लवकरच साहित्य उपलब्ध होईल
याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले, आरोग्य केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची यादी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली असून संबंधितांकडेही प्रत देण्यात आली आहे. लवकरच साहित्य उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT