

Why Mohan Bhagwat Advocated Dialogue with Pakistan
esakal
पाकिस्तानशी संवादाची दारे खुली ठेवण्याचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस (सरकार्यवाह) दत्तात्रेय होसबळे यांनी केले होते आता संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या या विधानाचे समर्थन केले आहे. होसबळे यांचा संदर्भ शेजारील देशाच्या सरकारशी नसून तिथल्या सामान्य जनतेशी होता, असे स्पष्टीकरण सरसंघचालकांनी दिले. तिरुवनंतपुरम येथे संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित एका संवाद कार्यक्रमात भागवत यांनी हे भाष्य केले.