कोकण

शासकीय कार्यालयातून नागरिकांची कामे मार्गी लावा

CD

- rat१९p१८.jpg-
26O38370
पावस ः नाखरे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये कार्यअहवालाचे प्रकाशन करताना पालकमंत्री
उदय सामंत सोबत इतर मान्यवर
---
जनतेची कामे वेळेत मार्गी लावा
पालकमंत्री सामंत : नाखरेतील कामांच्या अहवालाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २० ः शासकीय कार्यालये फक्त चकचकीत आणि टोलेजंग इमारती उभारून चालणार नाहीत तर त्यामधून सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागली पाहिजेत, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
तालुक्यातील नाखरे गावातील विकासकामांचे भूमिपूजन आणि पाच वर्षात मार्गी लागलेल्या कामांच्या अहवालाचे प्रकाशन सामंत यांनी केले. या वेळी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, जिल्हा परिषद सदस्य ॲड. महेंद्र मांडवकर, पंचायत समिती रत्नागिरी सदस्य नेताजी पाटील, नामदेव कोकरे, युवासेनेचे तुषार साळवी, कांचन नागवेकर आदी उपस्थित होते. नाखरेचे माजी सरपंच विजय चव्हाण यांनी सहकाऱ्याना सोबत घेऊन केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या लोकोपयोगी कामांचा कार्यकर्तृत्व अहवालातून घेतलेला आढावा प्रेरणादायी असल्याचे सामंत यांनी सांगितले. भावी पिढी सुसंस्कृत घडविण्यासाठी जिल्हा परिषद शाळाच कारणीभूत असून आपण मराठी माध्यमातून शिकलो तरी आयुष्यात काहीही अडचण जाणवली नसल्याचे सांगत पालकांना मराठी शाळेत पाल्यांना पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक सुहास वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाखाप्रमुख रामदास लांजेकर, केदार पावसकर, संजय मांडवकर, महिला, युवा वर्ग यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT