- rat२०p५.jpg-
26O38479
राजापूर ः ओबीसींची जातनिहाय जनगणनेसाठी सभापती नंदिनी कदम यांना निवेदन देताना गोपाळ गोंडाळ. या प्रसंगी सुरेश बाईत, सुधीर तांबे, दीपक नागले, प्रभाकर मापेलकर, उमेश शिवगण आदींसह पंचायत सदस्य.
----
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा
राजापूर पंचायत समितीत ठराव ; ग्रामपंचायतींनाही आवाहन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः २०२७ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र रकान्याद्वारे जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीसाठी राजापुरातून आक्रमक पाऊल उचलण्यात आले आहे. या मागणीची दखल घेत राजापूर तालुका पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
तालुका पंचायत समितीने असा ठराव करून शासनाकडे पाठवावा, अशा मागणीचे निवेदन सभापती नंदिनी कदम व उपसभापती अभिजित गुरव यांना देण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या मासिक बैठकीत सदस्य प्रसाद मोहकर यांनी हा ठराव मांडला, ज्याला राजेश गुरव यांनी अनुमोदन दिले. साधकबाधक चर्चेनंतर हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तालुका पंचायत समितीप्रमाणेच तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा आशयाचा ठराव करावा आणि तो शासनाकडे पाठवावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. ओबीसी समाजाने आपल्या हक्कासाठी शासनाकडे आग्रह धरावा, असे आवाहन कुणबी समाजातील अग्रणी समाजसेवक सुधीर तांबे, सत्यवान कणेरी, सतीश बंडबे, वसंत आंबेलकर, शांताराम शेढेकर, उमेश शिवगण, गोपाळ गोंडाळ, प्रभाकर मापेलकर, सुरेश बाईत आदींनी केले आहे. ‘जातनिहाय जनगणना न झाल्यास सविनय असहकार पुकारू’, असा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.
चौकट
त्या रकान्यात ओबीसींचा समावेश करा
अनुसूचित जाती-जमातीप्रमाणेच ओबीसींचीही जातनिहाय जनगणना करण्याचे केंद्र सरकारने यापूर्वी संकेत दिले होते; मात्र, जनगणनेसंबंधी जाहीर केलेल्या ३३ सूचींपैकी १२व्या क्रमांकावर केवळ अनुसूचित जाती-जमातींचा उल्लेख आहे. यात ओबीसींचा समावेश नसल्याने समाजात संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील कुणबी समाजबांधवांनी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.