कोकण

रत्नागिरी- आठवड्यात पाईपलाईन न फुटल्याचे दाखव आणि

CD

rat20p2.jpg
38476
रत्नागिरी ः जयस्तंभ येथे फुटलेली पाणी योजनेची जलवाहिनी.
rat20p3.jpg-
38477
जिल्हा रुग्णालयासमोरही जलवाहिनी फुटल्याने दुरूस्ती सुरू होती.
----------------

आठवड्यात तीनवेळा फुटली जलवाहिनी
सुधारित पाणी योजना फसली; कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : शहारतील सुधारित पाणी योजनेच्या २ किलोमीटरच्या जलवाहिनीचे अवघड जागेचे दुखणे अजूनही कायम आहे. वाहिनी फुटली नाही, असा एक आठवडा दाखवा, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या आठवड्यात शहरात तीनवेळा वाहिनी फुटल्यामुळे पालिकेवर अतिरिक्त कामाचा भार पडला आहे. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
शहरातील पाणी योजनेसाठी टाकलेली वाहिनी निकृष्ट दर्जाची असल्यामुळे दुरूस्ती केलेल्या ठिकाणीही ते वारंवार फुटत आहेत. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील भाग, सार्वजनिक बांधकाम विभागापुढील जयस्तंभ येथे आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी ही वाहिनी वारंवार फुटत आहे. मागील आठवड्यात एकदा नव्हे तर तीनवेळा ही वाहिनी फुटली. सुरवातीला बसस्थानकासमोर पाईप फुटला. त्याची दुरूस्ती करण्यासाठी पालिकेला रस्ता खोदावा लागला. हे काम करेपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले. तेथील दुरूस्ती पालिका प्रशासनाकडून करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसात जयस्तंभ येथे वाहिनी फुटली. त्याची दुरूस्ती केल्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयासमोर ही जलवाहिनी फुटली. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पालिका त्रस्त झाली आहे. भरउन्हात खोदाई करून दुरूस्ती करावी लागत आहे.

चौकट
देखभाल दुरूस्तीसाठी साडेचार लाख
शहरातील जिल्हा परिषद साठवण टाकी ते मांडवी परिसरातील २ किमी नवीन मुख्य वाहिनी खराब असल्याचा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिला आहे. ही पाईपलाईन वारंवार फुटत असून, योजनेच्या देखभालीसाठी ठेकेदाराने नकार दिला आहे. त्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी ४ लाख ५४ हजार रुपये पालिकेने तरतूद करून ठेवले आहेत. वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन ठेकेदाराची २७ लाख ६४ हजार अनामत रक्कम पालिकेने राखून ठेवली आहे. त्यामधून दुरूस्तीची कामे केली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक, तू शेवटची मॅच विनिंग खेळी केव्हा केली होतीस? Mumbai Indians च्या कर्णधारावर शब्दांचा मारा; MI vs GT सामन्यापूर्वी सल्ला

अफजलखान पाठोपाठ संजय दत्त साकारणार आणखी एक दमदार भूमिका ! नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीची तारीख जाहीर

मुंबईची तुंबई होणार! नालेसफाईचे काम धीम्या गतीने, आतापर्यंत २९ टक्के काम पूर्ण; पालिकेची आकडेवारी जाहीर

Nashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सातपूरला पत्नीचे अपहरण; नाशिकमध्ये उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT