कोकण

रत्नागिरी ः काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई

CD

काळा बाजार करणाऱ्या
विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई
कृषी विभाग; खरिपासाठी १२ हजार ५५० टन खत मंजूर
रत्नागिरी, ता. २० ः खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यातील खतांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या वेळी खतांचा काळा बाजार, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री होऊ शकते. याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि काळा बाजार करणाऱ्या विक्रेत्यांची तक्रार तातडीने करावी, संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगामी खरीप हंगामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खते आणि बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठी कृषी विभागाने १९ हजार ७० टन खतांची मागणी केली आहे. त्यापैकी १२ हजार ५५० टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत खतांचा तुटवडा भासू नये म्हणून एमएआयडीसीमार्फत जिल्ह्यातील २३ केंद्रांवर संरक्षित साठा करण्यात येणार आहे. त्यामध्ये ६५० टन युरिया आणि ५ टन डीएपी राखून ठेवला जाणार आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खतांचा संतुलित वापर करावा. कोकण कृषी विद्यापिठाने भातपिकासाठी हेक्टरी १००:५०:५० (नत्र:स्फुरद:पालाश) या प्रमाणात खत देण्याची शिफारस केली आहे. यामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो आणि उत्पादन खर्चात बचत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक, तू शेवटची मॅच विनिंग खेळी केव्हा केली होतीस? Mumbai Indians च्या कर्णधारावर शब्दांचा मारा; MI vs GT सामन्यापूर्वी सल्ला

अफजलखान पाठोपाठ संजय दत्त साकारणार आणखी एक दमदार भूमिका ! नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीची तारीख जाहीर

मुंबईची तुंबई होणार! नालेसफाईचे काम धीम्या गतीने, आतापर्यंत २९ टक्के काम पूर्ण; पालिकेची आकडेवारी जाहीर

Nashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सातपूरला पत्नीचे अपहरण; नाशिकमध्ये उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT