कोकण

श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची सावंतवाडीत प्राणप्रतिष्ठापना

CD

38568

श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची
सावंतवाडीत प्राणप्रतिष्ठापना

औदुंबर स्वामी मंदिरात सोहळा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० ः येथील पोलिस ठाण्याच्या समोर नव्याने उभारलेल्या औदुंबर स्वामी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे, जयेश खंदरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ​कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मंत्रघोषाने करण्यात आली. प्राणप्रतिष्ठापनेनंतर दिवसभर भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिक आणि स्वामीभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य करणारे भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोसले, उद्योजक शैलेश पै, शैलेश नाबर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, शासकीय ठेकेदार प्रताप मूर्ती, उद्योजक अमित आसोलकर, ए.के. कन्स्ट्रक्शनचे अनिकेत आसोलकर, श्रेयस मुंज, शासकीय ठेकेदार गौरेश सावंत, अरविंद सावंत, मुन्ना मुद्राळे, संदेश परब, विशाल सावंत, गौरव दळवी, पोलिस कर्मचारी अमित राऊळ, मनोज राऊत, हनुमंत धोत्रे, गौरेश राणे आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या अमोल टेंबकर, भुवन नाईक, अक्षय माशाळ, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे, आर्या टेंबकर, ओम टेंबकर, निरंजन सावंत, निखिल माळकर, नारायण पेंडुरकर, अभिषेक लाखे, प्रज्वल राऊत, चंद्रकांत धोत्रे आदींनी सहकार्य केले. सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, भाजप युवा नेते विशाल परब, माजी नगराध्यक्ष संजू परब, बबन साळगावकर, जिल्हा बँकेचे सदस्य विद्याधर परब, सुरेश भोगटे आदींनी श्रींचे दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT