कुडाळात उद्या पतसंस्था प्रशिक्षण
सावंतवाडी, ता. २० ः महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था नियामक मंडळ, पुणे यांच्या वतीने राज्यातील ग्रामीण बिगरशेती, नागरी व पगारदार पतसंस्थांची आर्थिक माहिती ‘एमआयएस’ प्रणालीद्वारे एकत्रित करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रणालीबाबत नियामक मंडळाने वेगवेगळे निकष लागू केले असून, त्याबाबत पतसंस्थांना सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग आणि सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २२) सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथे पतसंस्था प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा कुडाळ हायस्कूलनजीक असलेल्या मराठा समाज सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. संबंधितांनी आपल्या पतसंस्थेची आर्थिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांची माहिती सोबत ठेवावी. एमआयएस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.