देवरूखमध्ये इंधन दरांत तफावत
दोन पंपावर पाच रुपयांचा फरक ; वाहनधारकांत संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २० ः जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या बदलांचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उमटू लागले आहेत. देवरूख शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असून, शहरातील दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या पंपांवर दरांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याने वाहनधारकांमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवरूखमधील एका पेट्रोलपंपावर पेट्रोल १०५ रुपये तर डिझेल ९१ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे; मात्र, दुसऱ्या कंपनीच्या पंपावर हेच दर अनुक्रमे ११० रुपये (पेट्रोल) आणि ९५ रुपये (डिझेल) इतके आहेत. एकाच शहरात पेट्रोलमध्ये ५ रुपये तर डिझेलमध्ये ४ रुपयांचा फरक असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. दोन्ही पंप वेगवेगळ्या तेल कंपन्यांचे असल्याने हा फरक असल्याचे सांगण्यात येत असले, तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ सोसावी लागत आहे. या दरवाढीबाबत आणि दरातील तफावतीबाबत देवरूखमधील जागरूक वाहनधारकांनी तालुका पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. एकीकडे महागाई वाढत असताना इंधनाच्या या अनपेक्षित आणि विसंगत दरवाढीमुळे देवरूखकर मात्र चक्रावून गेले असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
---
कोट
दरातील फरकाबाबत वाहनचालकांनी संपर्क साधला होता. त्या अनुषंगाने संबंधित तेल कंपन्यांशी चर्चा केली असता, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आल्याचे सांगितले.
--महेंद्र कांबळे, तालुका पुरवठा अधिकारी, संगमेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.