कोकण

‘आरोग्य संपन्न गाव’मध्ये सहभागी व्हा

CD

38583

‘आरोग्यसंपन्न गाव’मध्ये सहभागी व्हा

सभापती गणेश राणे : देवगडमधील कार्यशाळेत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २० ः आरोग्य सार्वजनिक जबाबदारी मानून ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन सभापती गणेश राणे यांनी येथे केले. येथील पंचायत समितीच्यावतीने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमाअंतर्गत एकदिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी श्री. राणे बोलत होते.
ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी आणि ग्रामपातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्‍घाटन सभापती श्री. राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसभापती अमोल लोके, प्रभारी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित ढवळे, पंचायत समिती सदस्य विष्णु घाडी, सादिक डोंगरकर, विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर, सुनिता धुरी, आरोग्य सहाय्यक मदन मसके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण यांनी, गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, स्वच्छता, पोषण आणि सुरक्षित पाणीपुरवठा हा घटक असुन त्यामध्ये स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, कुपोषण निर्मूलनासाठी उपाययोजना, माता व बाल आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध तसेच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी श्री. लोके व श्री. डोंगरकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत डॉ. ढवळे तसेच डॉ. रामानंद घोडके यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना आणि वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये उपस्थितांनी विविध शंका मांडल्या व तज्ज्ञांकडून त्यांचे निरसन करण्यात आले. सर्वांनी स्वच्छता, आरोग्य व पोषण यासंदर्भात सातत्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रस्तावना डॉ. ढवळे यांनी केली. तालुका समुह संघटक स्वप्नील झोरे यांनी आभार मानले.
-------------------
कृती आराखड्याबाबत माहिती
कार्यशाळेतील सहभागींना आरोग्यसंपन्न गाव संकल्पना राबवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत माहिती तसेच गावनिहाय आरोग्य स्थितीचे विश्‍लेषण करून समस्यांची ओळख व त्यावरील उपाययोजना निश्‍चित करण्यावर भर देण्यात आला. यामुळे गावागावांत आरोग्यविषयक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते. याशिवाय डिजिटल माध्यमांचा वापर करून आरोग्य माहितीचा प्रसार कसा करावा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT