आयटीआयना ‘दक्ष’चा दर्जा
रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी; विकासाला गती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २०ः रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आणि कोकणातील तरुणांसाठी मोठी संधी निर्माण करणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या दक्ष प्रकल्पांतर्गत रत्नागिरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) यांची दक्ष आयटीआय म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या आयटीआय रँकिंग फ्रेमवर्कमधील कठोर निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत या संस्थांनी ही निवड मिळवली आहे. संस्थात्मक क्षमता, प्रशासन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगांशी समन्वय आणि विद्यार्थ्यांचा निकाल अशा ८९ निकषांवर रत्नागिरीच्या संस्थांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
दक्ष प्रकल्पांतर्गत या संस्थांना विशेष निधी, तांत्रिक सहकार्य आणि आधुनिक प्रशिक्षण सुविधा मिळणार असून, विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात आवश्यक असलेली प्रगत कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळेल. विशेषतः महिला आयटीआयची निवड झाल्याने जिल्ह्यातील तरुणींना तांत्रिक क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ तयार होऊन कोकणातील युवकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. रत्नागिरीच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला नवी गती देणारा हा निर्णय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.