38601
विधानसभा शिवसेना बीएलए
प्रमुखपदी परीक्षित मांजरेकर
सावंतवाडी मतदारसंघासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २० : शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यास सुरुवात केली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांची सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा ‘शिवसेना बीएलए प्रमुख’ म्हणून नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार करण्यात आली आहे. परीक्षित मांजरेकर यांनी आजवर जिल्हा सचिव म्हणून काम करताना तळागाळातील कार्यकर्त्यांशी दांडगा संपर्क ठेवला आहे. त्यांच्या याच कामाची पावती आणि संघटन कौशल्य पाहून त्यांच्यावर विधानसभा स्तरावरील ‘बूथ लेव्हल एजंट’ प्रमुखाची महत्त्वाची धुरा सोपवली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यांतील पक्षाची बूथ यंत्रणा सक्षम करण्याची मुख्य जबाबदारी आता त्यांच्यावर असेल. मांजरेकर यांच्या नियुक्तीचे वृत्त समजताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, आगामी काळात महायुती आणि शिवसेनेची ताकद प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास यावेळी मांजरेकर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.