कोकण

पक्षभेद बाजूला ठेवत स्वयंरोजगारासाठी ६३ जणांना लाभ

CD

rat२०p१८.jpg-
26O38577
रत्नागिरी- पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातील स्वयंरोजगारासाठी विविध साहित्यांचे वाटप करण्यासाठी लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी सभापती प्रवीण पांचाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
-------------
‘सेस’मधून स्वयंरोजगाराला चालना
सभापती पांचाळ ः ६३ जणांना साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : पंचायत समितीच्या सेस फंडातून तालुक्यातील ६३ लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे १८ लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. कोणत्याही राजकीय पक्षभेदाचा विचार न करता पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती सभापती प्रवीण पांचाळ यांनी दिली.
शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, या पालकमंत्री उदय सामंत यांच्या धोरणानुसार रत्नागिरी पंचायत समितीने महत्त्वाचे पाऊल उचलत स्वयंरोजगारासाठी साहित्याचे वाटप आयोजित करण्यात आले. ६३ लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून त्यांना लाभ मंजूर करण्यात आला. यामध्ये झेरॉक्स मशिन १७ लाभार्थी, शिलाई मशिन ९ लाभार्थी, घरघंटी ३७ अशी गरजेनुसार १५ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात आला. गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी तांत्रिक प्रक्रियेबाबत त्यांना माहिती दिली. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभधारकांच्या बँकखात्यात थेट पैसे जमा केले जातील. लाभार्थ्यांनी या निधीतून वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे फोटो पंचायत समितीकडे सादर करणे अनिवार्य आहे. या प्रसंगी उपसभापती गजानन धनावडे, अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
---
१८ लाखांच्या निधीचे वाटप
सभापती पांचाळ म्हणाले, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही कुणालाही या योजनेतून वगळलेले नाही. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून केवळ गरजूंना न्याय देणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, हाच आमचा उद्देश आहे. १८ लाख रु. निधीचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT