कोकण

भाट्येत कासवांची ५० पिल्लं समुद्रात सोडली

CD

-rat२०p२२.jpg-
26O38611
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर कासवांच्या पिल्लांना सुरक्षित सोडताना कासवमित्र महेश भाटकर.
----
भाट्येत कासव पिल्लांची समुद्रात झेप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० : शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी आज सकाळी कासवाच्या पहिल्या घरट्यामधून बाहेर आलेली पिल्लं समुद्रात झेपावली. भाट्ये समुद्रकिनारी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे यावर्षी कासवांची घरटी कमी झाली होती. सुमारे ५० पिल्ले आज समुद्रात सोडण्यात आली. कासवमित्र समीर भाटकर यांच्यासह महेश भाटकर, वेदांत देवकर, राजन भाटकर यांनी या पिल्लांना समुद्रकिनाऱ्यावर सोडले.
भाट्ये गावातील कासवमित्र समीर भाटकर गेल्या काही वर्षापासून भाट्ये समुद्रकिनारी कासवांचे संवर्धन करत आहेत.
ग्रामस्थांच्या मदतीने आणि वनविभाग व कांदळवन कक्षातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. मागील दोन-तीन वर्ष भाट्ये किनारी कासवांची अनेक घरटी झाली होती. यावर्षी कासवांच्या विणीच्या हंगामावेळीच भाट्ये समुद्रकिनारी बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे जेसीबी व अन्य यंत्रणांच्या कंपणामुळे कासव अंडी देण्यासाठी किनाऱ्याकडे फिरकलीच नाहीत. अवघी दोन घरटी संरक्षित करण्यात यश आले होते. एक कासव साधरण तीनवेळा अंडी देण्यासाठी येते; मात्र बंधाऱ्याच्या कामाचा परिणाम कासव संवर्धनावर झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT