कोकण

सायबर गुन्हेगारांविरुद्ध स्मिता सुतार यांची मोहीम

CD

सायबर गुन्हेगारांविरोधात स्मिता सुतार यांची मोहीम
पोलिस महानिरीक्षकांकडून सन्मान; गुन्हेगारांवर कारवाईसह जनजागृतीवर भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः आजच्या वेगवान डिजिटल युगात तंत्रज्ञान जितके सोयीचे आहे तितकेच सायबर गुन्हेगारीचे आव्हानही मोठे आहे; मात्र, रत्नागिरी पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध धडाकेबाज मोहीम उघडली आहे. या मोहिमेत सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांनी आपल्या कौशल्याने आणि जिद्दीने अल्पावधीतच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या प्रभावी कार्यशैलीची दखल घेत विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे आणि पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.
जिल्ह्यात पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली आणि अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सायबर क्राईमविरोधात ऑगस्ट २०२४ पासून सायबर पोलिस ठाण्याची धुरा सांभाळणाऱ्या सुतार यांनी तपासातील आपल्या चोख कामगिरीने समाजात सुरक्षेची भावना निर्माण केली आहे. गेल्या दोन वर्षांत रत्नागिरी सायबर पोलिसांनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या सीमा ओलांडून आंतरराज्यीय कारवाया केल्या आहेत. ट्रेडिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची कोट्यवधींची लूट करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सुतार यांच्या पथकाने थेट हैदराबाद, राजस्थान आणि गुजरात (राजकोट) येथून गुन्हेगारांना जेरबंद केले. तसेच, अलीकडेच गाजलेल्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणात बंगरुळ पोलिस किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला मुंबईतून अटक करण्यात त्यांना यश आले. सोशल मीडियाचा गैरवापर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट खाती उघडणारे असोत किंवा महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणारे विकृत असोत, अशा गुन्हेगारांना तांत्रिक तपासाच्या जोरावर त्यांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
‘प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला’ हा मंत्र जपत सुतार यांनी गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीवरही विशेष भर दिला आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराचे धडे देण्यासोबतच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची अमली पदार्थविरोधी मोहीम आणि भारतीय वैद्यकीय असोसिएशनच्या कार्यक्रमात त्यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
----
कोट
तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांचा शोध घेणे आणि दुसरीकडे जनतेला सतर्क करणे, अशा दुहेरी भूमिकेतून त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. रत्नागिरीतील सायबर पोलिस ठाण्याने सुतार यांच्या माध्यमातून केलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.

- प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BHIM UPI: BHIM अ‍ॅपमध्ये नवं फीचर! एका क्लिकमध्ये पाहा तुमचा CIBIL स्कोअर; कसं ते जाणून घ्या

Illegal Gas Cylinder Seized : बेकायदेशीर गॅस सिलिंडरच्या साठ्यावर छापा; ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

जुनं प्रेम अचानक समोर आलं तर? सतीश पुळेकर आणि इला भाटे पहिल्यांदाच एकत्र! 'तुला पाहता' चित्रपटाचे पोस्टर लाँच

Latest Marathi News Live Update : परकरमधील गुप्त कप्प्यातून गांजाची तस्करी, महिलेला कल्याणमध्ये अटक

Pachod News : प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू; पाचोड येथील खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT