कोकण

वाढत्या उन्हाबरोबर लिंबाचे दर वधारले

CD

उन्हाबरोबर लिंबाचे दर वधारले
एका नगाला १० रुपये ; सरबतास मागणी वाढली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : वाढत्या उन्हामुळे शहराचा पारा चढत असतानाच आता लिंबाच्या दरानेही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये लिंबाच्या किमती दुप्पट झाल्या असून, किरकोळ बाजारात एका लिंबासाठी ५ ते १० रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्यात गृहिणींचे बजेट कोलमडले असून, थंडगार लिंबू सरबतही आता महागले आहे.
चिपळूणच्या बाजारपेठेत मुख्यत्वे नाशिकमधून लिंबाची आवक होते; मात्र, उत्पादनपट्ट्यातूनच आवक घटल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात दराचा भडका उडाला आहे. मार्चमध्ये ८०० ते १००० रुपयांना मिळणारी लिंबाची गोणी आता थेट १८०० ते २००० रुपयांच्या पार गेली आहे. घाऊक बाजारात लिंबाचा १०० नगाला दर ४०० ते ६०० रुपयांवर पोहोचला आहे, अशी माहिती घाऊक विक्रेत्यांनी दिली.
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर लिंबाची लोणची आणि मुरांबे घातले जातात; मात्र, लिंबाच्या किमती कडाडल्याने या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या खर्चापेक्षा लिंबांचाच खर्च अधिक होत असल्याची प्रतिक्रिया रेश्मा धुरी या गृहिणीने दिली. वाहतूक खर्च आणि उष्णतेमुळे लिंबू खराब होण्याची भीती असल्याने किरकोळ विक्रेते लहान लिंबू ५ ते ८ रुपये तर दर्जेदार मोठे लिंबू १० रुपये दराने विकत आहेत. उन्हाळ्याच्या तडाख्यापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक लिंबू सरबताला पसंती देतात; मात्र, कच्च्या मालाचे दर वाढल्याने रस्त्यावरील स्टॉल्स आणि उपाहारगृहांमध्ये मिळणारे सरबतही महागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ''पार्थचा मला फोन आला.. डॅडींचं प्लेन पडलं...'', सुप्रिया सुळेंनी सांगितली विमान अपघाताची आठवण

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्तांना अटक; लाच घेताना रंगेहात पकडत अँटी करप्शन ब्युरोची कारवाई

BHIM UPI: BHIM अ‍ॅपमध्ये नवं फीचर! एका क्लिकमध्ये पाहा तुमचा CIBIL स्कोअर; कसं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT