कोकण

कुडाळ येथे उद्या ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा

CD

कुडाळ येथे उद्या ग्राहक
कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा गुरुवारी (ता. २३) येथील
मराठा समाज हॉलमध्ये सकाळी ९.३० वाजता केले आहे. संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे महावितरण सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे राज्य संघटक सर्जेराव जाधव, कोषाध्यक्ष सुनीता राजेघाटगे, सहसचिव प्रा. सुरेश पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेत शेतकरी ग्राहक प्रबोधन-सर्जेराव जाधव, ग्राहक पंचायतीची रचना व कार्यपद्धती-प्रा. सुरेश पाटील, संस्था निधी संकलन व विनियोग-सुनीता राजेघाटगे, सजग विद्यार्थी ग्राहक अभियान-श्रद्धा कदम, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यपद्धती-कमलाकांत कुबल व वफा खान, तर सायबर गुन्हे शाखा यांच्या वतीने ''सायबर सुरक्षा'' या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. या कार्यशाळेला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, कुडाळ तालुकाअध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA WORLD CUP 2026: अमेरिकेचा दबदबा! पॅराग्वेचा फडशा; ९६ वर्षांत न झालेला चमत्कार झाला... कॅनडाने कसाबसा पराभव टाळला

Pune Crime: पुण्यात MBBS प्रवेशाच्या नावाखाली ४० जणांना गंडा, लाखोंची फसवणूक; ऑर्थर रोड जेलमधून आरोपी ताब्यात

Monsoon El Nino Impact : विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात अलनिनोचा प्रभाव तीव्र; मॉन्सूनवर परिणाम, हवामान विभागाने व्यक्त केली चिंता

Sagrada Familia: युरोपचा ताजमहाल – सरगदा फॅमिलिया

Bidar Sisters Death : धक्कादायक! आंबा खाल्ल्यानंतर आईसह 5 मुलींना उलट्या-जुलाब; दोन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT