- rat२१p१४.jpg-
26O38703
संगमेश्वर ः असावी नदीपात्रात टाकलेला भराव.
‘असावी’ नदीपात्रात मातीचा भराव
पावसाळ्यात पुराचे संकट; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २१ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; मात्र धामणी येथील कोकण रेल्वे ओव्हरब्रिजजवळ असलेल्या ‘असावी’ नदीपात्रात दगडमातीचा भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे नदीचे नैसर्गिक पात्र अरुंद झाले असून, पावसाळ्यात पुराचे संकट ओढवण्याची भीती निर्माण झालेली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक ग्रामपंचायतीने संबंधित विभागाचे वारंवार लक्ष वेधले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरीही या पावसाळ्यात होईलच, असे नाही. हे काम करताना ठेकेदाराने दगड-माती नदीपात्राशेजारी टाकून ठेवली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी नदीपात्रातील पाणी अडल्यामुळे फुगवटा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे असावी नदीपात्रातील भराव तातडीने काढण्याबाबत लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे; मात्र, पावसाळा उंबरठ्यावर असतानाही संबंधित प्रशासकीय विभागांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म भूमिकेमुळे धामणी आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
असावी नदी ही या भागातील पाण्याचा निचरा करणारी मुख्य वाहिनी आहे; मात्र, महामार्गाच्या कामाच्या सोयीसाठी कंत्राटदाराने चक्क नदीपात्रातच भराव टाकून नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण केला आहे. मुसळधार पाऊस झाल्यास पाणी नदीपात्राबाहेर पडून लगतची शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. महसूल आणि पर्यावरण विभाग या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कंत्राटदाराला हा भराव काढण्यास भाग पाडणार का? की प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
----
कोट
असावी नदीतील गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल विभाग, पाटबंधारे विभाग आणि पर्यावरण विभागाकडून पावले उचलली गेली पाहिजेत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेला निसर्गाचे आणि कायद्याचे वेगळे नियम आणि अन्य लोकांना वेगळे नियम आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी हा भराव काढला नाही आणि पूरस्थिती निर्माण झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल.
- आप्पा पाध्ये, सामाजिक कार्यकर्ते, धामणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.