कोकण

जिल्हा परिषदेचा १६५ कोटींचा सर्वकष कृती आराखडा

CD

३८७८५
जिल्हा परिषदेचा १६५ कोटींचा आराखडा
जिल्हा नियोजनला प्रस्ताव ः अतिवृष्टीतील रस्ते, पूल, साकव दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : गेल्या वर्षी २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळणाचे कणा असणारे रस्ते, पूल आणि साकवांचे मोठे नुकसान झाले होते. हे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा रूळावर आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी सुमारे १६५ कोटी ३७ लाख ६० हजार रुपयांच्या निधीचा सर्वंकष कृती आराखडा जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार, चिपळूण आणि रत्नागिरी या दोन्ही विभागांतील ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ६२४ रस्ते क्षतिग्रस्त झाले असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी १२२ कोटी ८३ लाख रुपयांच्या निधीची तातडीने गरज आहे. यामध्ये चिपळूण विभागात सर्वाधिक १४९ रस्ते, तर रत्नागिरी विभागात १२१ रस्ते तातडीच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पुरात वाहून गेलेले पूल आणि मोऱ्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील अशा ८८ पूल व मोऱ्यांच्या कामासाठी १७ कोटी ९३ लाखांची मागणी करण्यात आली आहे. लांजा, खेड आणि गुहागर तालुक्याला २४ कोटी ६१ लाखांची गरज आहे. या तालुक्यांमध्ये पायवाटांवरील १०८ साकव वाहून गेल्याने ग्रामस्थांची मोठी पायपीट होत आहे.
ग्रामीण भागातील विस्कळीत झालेली वाहतूक यंत्रणा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीने या आराखड्याला तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे. निधी प्राप्त होताच ही कामे युद्धपातळीवर हाती घेतली जाणार असून, आगामी पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. १६५ कोटींचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समिती यावर किती लवकर शिक्कामोर्तब करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


तालुकानिहाय आकडेवारी
- चिपळूण तालुक्याला ३४ कोटी ९२ लाखांची गरज
- रत्नागिरी तालुक्यात ३४ कोटी ७ लाख
- राजापूर तालुक्यात २७ कोटी ५८ लाख
- लांजा, खेड, गुहागरसाठी २४ कोटी ६१ लाखांची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT