कोकण

नेर्लेतील महिलांचे उपोषण स्थगित

CD

38783

नेर्लेतील महिलांचे उपोषण स्थगित

सकारात्मक चर्चा; ठाकरे शिवसेनेची शिष्टाई

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ ः तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर नेर्लेतील महिलांनी सोमवारपासून (ता. २०) सुरू केलेले उपोषण आज सायंकाळी स्थगित केले.
नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानमध्ये बंदी आदेश लागू असताना गावातील दोघांनी प्रवेश केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नेर्लेतील नीलम नवनाथ पांचाळ आणि आरती भालचंद्र सुर्वे यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तहसीलदार सूर्यकांत पाटील आणि पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या उपोषणावर ठाम राहिल्या. दरम्यान, आज सकाळी देखील दोन्ही अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्या महिलांशी चर्चा केली. मात्र, ती निष्फळ ठरली. दुपारनंतर ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांनी उपोषणकर्त्या महिलांशी चर्चा केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांच्या वतीने त्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर अखेर महिलांनी उपोषण स्थगित केले. यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील, नायब तहसीलदार सचिन निकम, शिवाजी सुतार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

सतत वस्तू हातातून पडणं, चालताना अडखळणं? मुलांमध्ये दिसणारी ही लक्षणं दुर्लक्षित करू नका; असू शकतात मेंदूतील ट्युमरचे संकेत

चिमुकला पाण्यात बुडत होता; वाचवण्यासाठी दोघांची नदीत उडी अन्...; महादेव घाटावरील पिकनिकचा आनंद क्षणात शोकांतिकेत

SCROLL FOR NEXT