कोकण

दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी ठाकरे सेना आक्रमक

CD

पॅसेंजर दादरवरूनच सोडा
खासदार सावंत आक्रमक ; आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः कोविड काळापासून दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन दिवा येथून सोडण्यात येत आहे. ही गाडी दादर येथून सोडण्यात यावी यासाठी तीव्र जनआंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उबाठा) नेते व खासदार अरविंद सावंत यांनी मंगळवारी (ता. २१) रेल्वे प्रशासनाला दिला. मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन त्यांनी कोकण रेल्वेसह राज्यातील इतर प्रलंबित रेल्वेप्रश्नांबाबत आग्रही भूमिका मांडली.
मध्यरेल्वेने उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करताना उत्तर भारतासाठी गोरखपूरपर्यंत अनेक गाड्या सुरू केल्या; मात्र कोकणवास्यांची जीवनवाहिनी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर विषयीचा निर्णय अद्यापही घेतलेला नाही. यावरून कोकणवास्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या संदर्भात खासदार सावंत यांनी यापूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली होती. मंगळवारी महाव्यवस्थापकांशी झालेल्या चर्चेत त्यांनी रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, असे ठणकावून सांगितले. ‘मध्यरेल्वेच्या कारभारात सातत्याने मराठी भाषेची आणि मराठी माणसाची गळचेपी होत आहे,’र असा ठपका खासदार सावंत यांनी ठेवला आहे. राज्यांतर्गत गाड्या मुख्य स्थानकापर्यंत न नेता गैरसोयीच्या ठिकाणी थांबवून मराठी प्रवाशांची अडवणूक केली जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी मध्यरेल्वेचे उपव्यवस्थापक अरविंद मालखेडे, भारतीय कामगार सेनेचे सहसरचिटणीस दिलीप जाधव, रेलकामगार सेनेचे पदाधिकारी भारत शर्मा, योगेश जाधव आणि इतर रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Mission: ‘ज्ञानभारतम्’ मोहिमेतून जपली जाणार भारताची ज्ञानपरंपरा; संग्राहकांकडील एक कोटी हस्तलिखितांचा शोध घेणार, मौल्यवान वारसा होणार डिजिटल

Messi Vs Ronaldo: मेस्सीने विश्वचषक जिंकला, आता रोनाल्डोची पाळी? फुटबॉल चाहत्यांमध्ये रंगली नवी चर्चा

Buldhana: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी बुलडाण्यात दाखल; आ. गायकवाड यांची प्रत्यक्ष पाहणी; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT