वागदेत शनिवारी
महिला मेळावा
कणकवली ः सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संघाने २५ एप्रिल रोजी वागदे येथील गोपुरी आश्रम येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. शनिवारी सकाळी १०.३० वा. उद्घाटन गोपुरी सभागृह तथागत नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रोहिता तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम स. १०.३० ते सायं. ४.३० असा असून सकाळी उद्घाटन व दुसर्या न सत्रात महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम - होतील. महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रद्धा कदम, रुपाली पेंडुरकर, ममता जाधव, आरती कदम, वृक्षाली जाधव, स्वाती कदम, प्रणाली कासले यांनी केले आहे.
---
सावंतवाडी पंचायत
समितीची आज सभा
सावंतवाडी ः सावंतवाडी पंचायत समितीचे मासिक सभा सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले प्राथमिक शाळा नं. ३ च्या हॉलमध्ये २३ एप्रिलला सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. सावंतवाडी पं. स.चे कार्यालय तालुका स्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. सभापती व उपसभापती यांची केबिन लवकरच तालुका स्कूलच्या जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव आहे. आता हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले गेली आहे. पाच वर्षे प्रशासक होते. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक झाली नाही. आता लोकराज्य अस्तित्वात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडी समितीमध्ये सभापती उपसभापती आणि सदस्य यांचा कारभार सुरू झाला आहे.
-------------
ओटवणे येथे
वासंतिक वर्ग
ओटवणे ः सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती आणि सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ओटवणे येथे २५ एप्रिल ते २९ एप्रिलपर्यंत वासंतिक वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर येथे पाच दिवसीय हा वासंतिक वर्ग सकाळी ९.३० ते ११ या वेळेत दररोज दीड तास सुरू राहणार आहे. या वासंतिक वर्गात निवृत्त शिक्षक मनोहर मयेकर, कवी कृष्णा देवळी, सुनील मेस्त्री संस्कृतविषयी उपयुक्त स्तोत्रे व सुभाषिते यांची माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी वासंतिक वर्ग पुस्तिकेचे पाठांतर करण्यात येणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका संस्कृत भारती समिती आणि सावंतवाडी वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर यांनी केले आहे.
.............................
इन्सुलीत २५ ला
विविध कार्यक्रम
बांदा ः इन्सुली-परबवाडी-ब्राम्हण देवस्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही २५ ला वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद होईल. दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता महिलांची फुगडी व भजन असे कार्यक्रम होतील. तसेच रात्री ७.३० वा. ‘लकी ड्रॉ’ व ९ वा. श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा रक्त स्कंदेश्वरी महिमा’ हा भव्य पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
.............................
धवडकी चिले मैदानावर
मेपासून क्रिकेट स्पर्धा
ओटवणे ः माडखोल भाजप आयोजित १, २ व ३ मेस धवडकी चिले मैदान येथे एक गाव एक संघ मर्यादित प्रकाश झोतातील ओव्हरआर्म कमळ चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुरस्कृत प्रथम पारितोषिक वै एक लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पन्नास हजार रुपये तसेच वैयक्तिक बक्षिसे. इच्छुक संघानी रोशन मुरकर आणि सतेज चिले, जयू मडगावकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अमित राऊळ, दीपक सुकी यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.