38911
बोगस मतदान रोखण्यासाठी काम करा
संजू परब : वेंगुर्ले येथे बीएलए प्रशिक्षण शिबिर
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ : बीएलए यांनी नेमके कसे काम केले पाहिजे याची माहिती देण्यासाठी आज हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. भविष्यात होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी आता योग्य पद्धतीने काम होणे गरजेचे आहे. पक्षाच्या सर्वच पदाधिकारी यांनी यात सहभागी घेऊन आपण नेमलेल्या बीएमए ना मदत केली पाहिजे. या संपूर्ण घडामोडींवर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देऊन आहेत. पक्षवढीसाठी हे मिशन अत्यंत महत्वाचे आहे. देशाच्या भवितव्यासाठी आपण काम करतोय हे डोळ्यासमोर ठेऊन सर्व बीएलाएनी काम करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी वेंगुर्ले येथे केले.
येथील तालुका शिवसेनेच्या वतीने बी.एल.ए. प्रशिक्षण शिबीर येथील स्वामीनी मंगल कार्यालयात आयोजित केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख परब बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रभारी तालुकाप्रमुख तथा पं स उपसभापती सचिन देसाई, जिल्हा संघटक सुनील डुबळे, बाळा दळवी, काशिनाथ नार्वेकर, अजित राऊळ, शितल साळगावकर, पं स सदस्य साक्षी नार्वेकर, नगरसेविका लीना म्हापणकर, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, मितेश परब यांच्या सहित शिवसेनेचे पदाधिकारी, शासनाचे प्रतिनिधी व पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले बी.एल.ए. आदी उपस्थित होते. सुनील डुबळे यांनी नगरपालिका निवडणुकीत आलेले अनुभव सांगत पुढील काळात मतदानासाठी जागरूक होणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर अजित राऊळ यांनी शासनाच्या प्रतिनिधी यांना विविध शंका विचारत माहिती घेतली. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी प्रास्ताविकात बी.एल.ए. यांनी नेमके कोणत्या दिशेने काम करायचे आहे व शासनाच्या अधिकाऱ्यां समवेत समन्वय साधून कसे काम करायचे याची माहिती दिली.
----------
अभ्यास करून काम करावे
यावेळी सचिन देसाई म्हणाले, सर्व बी.एल.ए. यांनी याचा पूर्ण अभ्यास करून काम करावे. पुढील २० वर्षे नवीन मतदार याद्या कायम राहणार आहे. यामुळे पदाधिकारी यांना पुढील निवडणूक प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असेल तर आपले मतदार वाढले पाहिजेत, आपल्या विचाराचे मतदार कायम राहिले पाहिजेत यासाठी काम करावे असे आवाहनही केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.