कोकण

पादचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे

CD

महामार्ग विकासात पदपथ गायब
लांज्यातील वास्तव ; पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २२ : मुंबई-गोवा महामार्गाचे काम लांजा शहरात युद्धपातळीवर सुरू असतानाच एक गंभीर उणीव समोर आली आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दुतर्फा सेवारस्ता आणि गटारांची कामे पूर्ण होत आली असली तरी पादचाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या ‘पदपथ’’चा कुठेही पत्ता नाही. यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वृद्धांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत असून, लांजातील पादचाऱ्यांची सुरक्षा आता ‘रामभरोसे’ आहे.
लांजा तहसील कार्यालय, हायस्कूल, ग्रामीण रुग्णालय, पोलिस ठाणे आणि पंचायत समिती यांसारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये व बँका महामार्गालगतच आहेत. बाजारपेठेतही नागरिकांची मोठी वर्दळ असते. नियमानुसार वर्दळीच्या ठिकाणी किमान १.८ ते २.५ मीटर रूंदीचे पदपथ असणे आवश्यक आहे; मात्र, लांज्यात तशी कोणतीही तरतूद दिसत नाही. त्यामुळे ‘आम्ही चालायचे कुठून? रस्त्यावरून की गटारावरून?’ असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.
महामार्गावर उड्डाणपुलाचे काम आणि भरावाची भिंत उभारण्याचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. अशातच पादचारी मार्ग नसल्याने नागरिकांना वाहनांच्या वर्दळीतूनच वाट काढावी लागते. पावसाळ्यात गटारांवरील झाकणे किंवा उघडी गटारे पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू शकतात. एकीकडे नगरपंचायत लांजा शहराच्या विकास आराखड्याच्या गप्पा मारत असताना मूलभूत अशा पादचारी मार्गाकडे दुर्लक्ष का केले जात आहे? विकासकामात फूटपाथला गटार हा पर्याय असू शकतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात ही समस्या अधिक उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
---
कोट
पदपथ नसल्याने महामार्गावरून चालताना एखादी दुर्घटना घडल्यास किंवा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने देणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

- मोहन तोडकरी, शहरप्रमुख, ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT