LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

IPL 2026 LSG vs RR Marathi Cricket News : आयपीएल २०२६ मधील सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा इतिहास रचला. त्याने ग्लेन मॅक्सवेलचा विक्रम मोडला, तर सर्वात कमी वयात हा पराक्रम करत पृथ्वी शॉचाही रेकॉर्ड मागे टाकला.
Vaibhav Sooryavanshi creates history in IPL 2026 by breaking Glenn Maxwell and Prithvi Shaw’s records

Vaibhav Sooryavanshi creates history in IPL 2026 by breaking Glenn Maxwell and Prithvi Shaw’s records

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Updates : सलग चार विजय मिळवून सुसाट पळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला अचानक ब्रेक लागला आणि त्यांना सलग दोन पराभव पत्करावे लागले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये RR बुधवारी लखनौ सुपर जायंट्सचा सामना करायला मैदानावर उतरले आहेत. LSG नेही पराभवाची हॅटट्रिक साजरी केली आहे आणि त्यामुळे आज कोणता संघ विजयपथावर येतो, याची उत्सुकता आहे. १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Suryavanshi) आजच्या सामन्यातही विक्रमाला गवसणी घातली. त्याने दुसरी धाव घेताच ऑस्ट्रेलियन ग्रेट ग्लेन मॅक्सवेल याचा विक्रम मोडला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com