लोटे एमआयडीसीत
रोजगार मेळावा
रत्नागिरी ः जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २८ रोजी उद्योगभवन, लोटे परशुराम इंडस्ट्रिअल असेाशिएशन, एमआयडीसी लोटे, ता. खेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचे प्र. साहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत ठेवावे. तसेय, नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या साहाय्याने २८ एप्रिल रोजी आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी.
परशुराम जयंती
ओशिवळेत साजरी
राजापूर ः तालुक्यातील ओशिवळे येथे भगवान परशुराम जयंती पूर्व विभाग ब्रह्मवृंदांच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ओशिवळे येथील कुळकर्णी गुरुजी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला ओणी, तिवरे, रायपाटण, तळवडे, चुनाकोळवण, मंदरूळ आदी भागांतील ब्रह्मवृंदांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यक्रमात रायपाटण हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विनोद करंदीकर यांनी भगवान परशुराम यांच्या कार्यावर मार्गदर्शन केले. तसेच रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक मंदार सप्रे, ब्राह्मणसेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण करंबेळकर, ओणी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रकाश पाध्ये आणि कुळकर्णी गुरुजी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी शासनाच्या ‘अमृत’ योजनेबाबत माहिती देण्यात आली.
संरक्षण समितीची
सोमवारी बैठक
रत्नागिरी ः माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली २७ रोजी दुपारी १२ वा. पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षणासंदर्भात तक्रारी असल्यास नमूद बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहित वेळेत उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.