कोकण

‘भुल भुलैय्या’ नाट्यकृतीवर सिंधुदुर्गची छाप

CD

38933

‘भुल भुलैय्या’ नाट्यकृतीवर सिंधुदुर्गची छाप

मुंबईत शुभारंभ; रंगभूमीवरील वेगळ्या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २२ : व्यावसायीक रंगभूमीवर वेगळी दिशा शोधणारी ‘भुल भुलैय्या’ ही नाट्यकृती दिमाखात सादर झाली आहे. या सखोल आणि विचारप्रवर्तक शोधयात्रा ठरणाऱ्या नाटकावर सिंधुदुर्गातील नाट्यनिर्मात्यांची छाप आहे.
येथील लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स व रंगतसंगत निर्मित ‘भुलभुल्लैया’ या व्यावसायिक नाटकाचा शुभारंभचा प्रयोग नुकताच रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे राज्याचे सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे, सारस्वत बँकचे संचालक अनिल आंबेसकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, डॉ. अनिल नेरूरकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ॲड. संग्राम देसाई आदींसह नाट्यरसिक, सर्व कलाकार उपस्थित होते.
रंगभूमीवर अनोखा प्रयोग म्हणून ‘भुल भुलैय्या’ या नाटकाकडे पाहिले जाते. याचा फॉर्म पारंपरिक चौकटींपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. विज्ञान, वास्तुशास्त्र आणि तंत्र-मंत्र या तीनही घटकांच्या साह्याने ‘आत्म्याचा शोध’ घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हे नाटक केवळ फॅण्टसी नसून, एक सखोल आणि विचारप्रवर्तक शोधयात्रा आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे निर्माते कुडाळ येथील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल अखेरीस हे नाटक होणार, अशी माहिती निर्माते रणजीत देसाई यांनी दिली. या नाटकात जेष्ठ सिने नाट्य अभिनेत्री प्रिया बेर्डे, कुडाळचा साहिल देसाई व इतर कलाकार भूमिका साकारत आहेत.
तब्बल ५३ वर्षांची अखंड नाट्यसेवा आणि १२५ नाट्यकृतींचा समृद्ध अनुभव पाठीशी असलेल्या सोहोनी यांनी भुल भुलैय्या या नव्या नाटकाद्वारे एक वेगळी दिशा शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भुल भुलैय्या नाटकाचे निर्माते असलेले केदार सामंत आणि रणजीत देसाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील असून बाबा वर्दम थिएटर्स या हौशी नाट्य संस्थेशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे, साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी हे कलाकार नाटकात आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे  तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत.
--------
कोट
भूलभुलैया हा आमच्यासाठी रोजचा खेळ आहे तर रसिकांसाठी अभिनव प्रयोग आहे. मराठी रंगभूमीला संपन्न करण्यासाठी अनेकांनी हातभार लावलेत. कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात आपल्या लाल मातीतील युवा मित्र भूलभुलैया नाटकाचे निर्माते रणजीत देसाई यांचा सामाजिक राजकीय जेवढा वावर आहे, तेवढाच कला सांस्कृतिक क्षेत्राला वृद्धिंगत करण्यासाठी ते व त्यांची टीम प्रचंड मेहनत घेत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहनी यांची १२५ वी कलाकृती याठिकाणी  सादर करत आहेत. भविष्यात या नाटकाचे २५० प्रयोग व्हावेत.
- आशीष शेलार, सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

SCROLL FOR NEXT