कोकण

ताशे वाजवत आमंत्रणे देण्याची पद्धत काळाच्या ओघात लुप्त

CD

rat२२p११.jpg
26O38908
साखरपा : आमंत्रणासाठी आलेल्या यजमानांसोबत ताशे वाजंत्री.

‘आमंत्रण ताशा’ काळाच्या ओघात लुप्त
परंपरा केवळ आठवणीत ; इंटरनेटवर सर्वाधिक भर
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २२ : कोकणची भूमी ही लोककला आणि लोकवाद्यांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र, बदलत्या काळानुसार येथील अनेक पारंपरिक प्रथा आता इतिहासजमा होऊ लागल्या आहेत. एकेकाळी लग्न किंवा मुंजीचे आमंत्रण देताना यजमानांच्या सोबतीला वाजणारे ताशे आता काळाच्या ओघात लुप्त झाले असून, ही परंपरा आता केवळ आठवणीतच उरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात लग्नाचे किंवा मुंजीचे कार्य ठरले की, ‘अक्षता’ टाकण्याची एक विशेष पद्धत होती. यजमान जेव्हा वाडीतील घराघरात आमंत्रण द्यायला जात तेव्हा त्यांच्यासोबत ताशे वाजवणारे कलाकार असायचे. यजमान घरात आमंत्रण पत्रिका, विडा आणि अक्षता घेऊन गेले की, अंगणात ताशाचा कडकडाट व्हायचा. यामुळे संपूर्ण वाडीला संबंधित घरात मंगलकार्य असल्याची वर्दी मिळत असे. शिमगा, वरात आणि तुळशीच्या लग्नाप्रमाणेच हे ‘आमंत्रण वादन’ प्रतिष्ठेचे आणि उत्साहाचे मानले जाई.
पारंपरिक ताशा वादन करणारी जुनी पिढी आता काळाच्या पडद्याआड गेली आहे. नवी पिढी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरात स्थायिक झाल्यामुळे या लोककलेचा वारसा पुढे नेणारे हात कमी झाले आहेत. आता इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जमान्यात ‘डिजिटल’ आमंत्रणांची पद्धत रूढ झाली आहे. मोबाइलवरून पत्रिका पाठवण्यावर अधिक भर दिला जात आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात पूर्वीसारखे पुरेसे मनुष्यबळ राहिलेले नाही. त्यामुळे यजमान स्वतः न जाता अनेकदा पत्रिका इतरांच्या हाती पाठवल्या जातात. कोकणातील सांस्कृतिक वैभवाचा हा एक अविभाज्य भाग होता; मात्र, आधुनिकतेच्या धावपळीत घराच्या अंगणात वाजणारे ताशांचे सूर आता ऐकू येईनासे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran ceasefire : इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी धुडकावली; हॉर्मुझमध्ये गोळीबार, भारताकडे येणारे जहाज IRGC ने घेतले ताब्यात

Thane: ठाणेकरांवर पाणीटंचाईचे सावट, २४ तास पाणीपुरवठा बंद; कधी आणि कोणत्या भागात? वाचा सविस्तर...

संदीप पाठक भावूक! 'वऱ्हाड'च्या ६०० व्या प्रयोगाला जिवलग मित्रांनी दिलं विमानाचं 'सरप्राईज'

नवरदेव ऐनवेळी फरार, नवरीचे लग्न धाकट्या दिराशी लावले, पण आता वडिलांच्या अजब मागणीने सगळेच चक्रावले

Latest Marathi News Live Update: लग्न जुळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

SCROLL FOR NEXT