अंध युवा मुलींसाठी मेमध्ये
सोलापुरात क्रिकेट प्रशिक्षण
नवी संधी : २५ एप्रिलपर्यंत नोंदणीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील अंध युवा मुलींकरिता विशेष क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ ते २४ मे या कालावधीत सोलापूर येथे होणार असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी नवीन महिला खेळाडूंनी २५ एप्रिलपर्यंत आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ज्या मुलींनी यापूर्वी कोणत्याही शिबिरात सहभाग घेतलेला नाही, अशा नवीन खेळाडूंना येथे प्राधान्य दिले जाणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यात महाराष्ट्र राज्यासाठी नवीन आणि गुणवत्तापूर्ण युवा महिला खेळाडूंचा शोध घेतला जाणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची निवास, भोजन आणि इतर सर्व व्यवस्था विनामूल्य केली जाणार आहे. याशिवाय खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य, युनिफॉर्म, बूट आणि विशेष भेटवस्तू देखील दिल्या जाणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी आपले नाव, जिल्हा, अंधत्वाचे प्रमाण तसेच युनिफॉर्म आणि बूटची साईज कळवणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी अंधत्वाचे प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. नाव नोंदणीसाठी ९८६९३२९१४१ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवावा. तसेच blindcabm@gmail.com या ईमेलवर देखील आपली माहिती पाठवता येईल. तरी जास्तीत जास्त अंध युवा मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.