कोकण

तळेरे बसस्थानकाचा प्रश्न ऐरणीवर

CD

38953
तळेरे : बसस्थानकाच्या सुविधांबाबत विभाग नियंत्रकांना निवेदन देताना सरपंच हनुमंत तळेकर. सोबत राजेश जाधव.
38954
तळेरे : बसस्थानक परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे.

तळेरे बसस्थानकाचा प्रश्न ऐरणीवर

सुविधांसाठी ग्रामपंचायतीचे साकडे; संरक्षक भिंत, प्रसाधनगृहे, रस्ते दयनीय

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि तळेरे-कोल्हापूर राज्य महामार्ग यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या तळेरे बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर, बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी तळेरे ग्रामपंचायतीने केली आहे.
याबाबत सरपंच हनुमंत तळेकर यांनी विभाग नियंत्रक घोडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव उपस्थित होते. तळेरे बसस्थानक हे परिसरातील प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत मध्यवर्ती ठिकाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची प्रचंड पडझड झाली आहे. संरक्षक भिंत, प्रवाशांची प्रसाधनगृहे यांची अवस्था दयनीय असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई, गोवा आणि कोल्हापूर या तिन्ही मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची, विद्यार्थ्यांची आणि ज्येष्ठ नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते. बसस्थानकातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून उपहारगृहदेखील कित्येक वर्षे बंद आहे. काही अत्यावश्यक कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. उर्वरित कामे बसस्थानक विकास आराखड्यात समाविष्ट करून पूर्ण केली जातील, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहे.
-------------
प्रमुख मागण्या अशा...
या निवेदनात अनेक मागण्या केल्या असून यांतील महत्त्वाच्या म्हणजे, मुख्य इमारत व प्रसाधनगृहांचे नूतनीकरण करणे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुसज्ज वाहतूक नियंत्रण कक्ष, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष आणि सुसज्ज प्रतीक्षालय, सुशोभीकरण, परिसराचे डांबरीकरण, सुशोभीकरण आणि हरितीकरण अशा मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sriram Krishnan: ट्रम्प प्रशासनाला मोठा धक्का! भारतीय वंशाच्या एआय तज्ञांनी घेतला व्हाईट हाऊस सोडण्याचा निर्णय, कोण आहेत श्रीराम कृष्णन?

रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

IND vs AFG,Test: भारताच्या साडेपाचशे धावा, तरीही अफगाण गोलंदाजाचा डंका; जुरेलला बाद करून काढला वचपा; VIDEO

Latest Marathi News Live Update : देशासह राज्यात 'नो टॉलरन्स फॉर ड्रुग्ज' मोहीम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT