कोकण

नाथजोगी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार

CD

- ratchl२२३.jpg
26O38975
ः चिपळूण ः नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचे अभिनंदन करताना नाथजोगी सेवा समाजाचे पदाधिकारी.

नाथजोगी समाजाच्या
स्मशानभूमी प्रश्नाला गती
नगराध्यक्ष सकारात्मक; आठ दिवसांत बैठक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : चिपळूण शहरातील शंकरवाडी येथील नाथजोगी सेवा समाजाच्या प्रलंबित स्मशानभूमी व दफनभूमीच्या प्रश्नाकडे मुख्याधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन नगरसेवक संदीप भिसे यांनी लक्ष वेधले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि मुख्याधिकारी संजय जाधव यांनी संबंधित जागामालक व समाज प्रतिनिधींची आठ दिवसांत एकत्रित बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले आहे. या विषयावर अंतिम तोडगा काढला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नगरपालिकेतील भेटीवेळी झालेल्या चर्चेत मुख्याधिकारी संजय जाधव यांनी प्रशासनाला या विषयाची सखोल माहिती घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नगरसेवक संदीप भिसे यांनी, जोपर्यंत समाजाचा हा हक्काचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार व्यक्त केला. तसेच माजी नगरसेवक विजय चितळे यांनी प्रशासन आणि जागामालक यांच्यात समन्वय साधून मार्ग काढण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या शिष्टमंडळात आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका रसिका देवळेकर, अंजली कदम, वैशाली निमकर यांच्यासह नाथजोगी सेवा समाजाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

Latest Marathi News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व चार आरोपींना मोठा दिलासा

Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT