कोकण

ग्रामीण दळणवळणाला मिळणार ''बुस्टर डोस''

CD

ग्रामीण रस्त्यांचा होणार कायापालट
१६७ कोटींचा आराखडा; ५७९ कामांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि कमकुवत पुलांच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने १६७ कोटी ५८ लाख रुपयांचा आराखडा राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठवला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५७९ रस्त्यांची व पुलाची कामे समाविष्ट केलेली आहेत. त्याला लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळेल, अशी आशा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना आहे.
आपत्ती व्यवस्थापनामधून जिल्हा परिषदेने पूल, रस्तेदुरुस्तीसह विविध कामांसाठी जिल्हा नियोजनकडे १६७ कोटींचा आराखडा पाठवलेला आहे. त्या पाठोपाठ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागालाही विशेष आराखडा सादर केलेला आहे. या आराखड्याचे नियोजन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केले असून, त्याची दोन मुख्य गटांत विभागणी केली आहे. गट ‘ब’ मध्ये ५०२ मोठ्या कामांसाठी १५२ कोटी ६ लाख रुपयांची मागणी केली आहे. गट ‘क’ मध्ये ७७ छोटी-मोठी दुरुस्ती कामे आणि पुलांच्या मजबुतीकरणासाठी १५ कोटी ५२ लाखांची मागणी केली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्ते वाहून जाणे किंवा पुलांची दुरवस्था होणे, या तक्रारींवर या आराखड्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव शासनस्तरावर सादर केला असून, मंजुरीनंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर त्वरित कामे सुरू करण्याचे नियोजन आहे.
---
प्रत्येक मतदार संघासाठी निधी
* दापोली : ५८ कामांसाठी २९ कोटी ६६ लाख
* गुहागर : ८४ कामांसाठी २७ कोटी ४९ लाख
* रत्नागिरी : ७४ कामांसाठी २० कोटी २० लाख
* राजापूर-लांजा पट्टा: सुमारे २५ कोटी रुपये
* चिपळूण : ८६ कामांसाठी १३ कोटी १० लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT