कोकण

राजापूर -मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरोग्यमंत्री सकारात्मक

CD

- rat२२p१८.jpg-
26O38950
राजापूर ः समितीच्यावतीने आबिटकर यांना स्मरणपत्र, जागा हस्तांतरित आदेश व प्रशासकीय मंजुरी पत्रदेखील सादर करण्यात आले.

वाटूळ हॉस्पिटलसाठी आशेची किरण
आरोग्यमंत्र्यांनी घेतली दखल; हालचालींना वेग
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ : कोकणवासियांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या राजापूर तालुक्यातील वाटूळ येथील प्रस्तावित ‘सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ बाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे.
पंचक्रोशी ग्रामविकास समिती (राजापूर-मुंबई) यांच्या वतीने आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आरोग्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. या वेळी हॉस्पिटलचे रखडलेले काम तातडीने सुरू करण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांना मुंबई किंवा कोल्हापूरकडे धाव घ्यावी लागते. हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेला आहे, ही बाब शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आमदार सदाभाऊ खोत यांनीही कोकणातील आरोग्यस्थितीबाबत पोटतिडकीने बाजू मांडली. समितीच्यावतीने आरोग्यमंत्र्यांना स्मरणपत्र, जागा हस्तांतरण आदेश आणि प्रशासकीय मंजुरीपत्र सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष विश्वास राघव, माजी अध्यक्ष अनिल भोवड, कार्याध्यक्ष संतोष जोगले, सरचिटणीस संदेश मिठारी, खजिनदार अनिल राऊत, प्रशासकीय समिती प्रमुख आदिनाथ कपाळे यांच्यासह प्रकाश दळवी, महेश गोंडाळ, सुशांत आडिवरेकर, दिनेश कुडकर आणि मंदार आडिवरेकर उपस्थित होते.
वाटूळ येथील नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर मंत्री आबिटकर म्हणाले, या प्रकल्पाबाबत मी प्रशासनाकडून तत्काळ सविस्तर माहिती घेतो. नेमकी अडचण कुठे आहे, हे समजून घेऊन माझ्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल. आवश्यकता भासल्यास या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कोकणवासीयांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत मनसे कामगार युनियन स्थापनेवरून भाजप-मनसे आमनेसामने

SCROLL FOR NEXT