रत्नागिरीत परिसरात तुरळक पाऊस
विजांचा कडकडाट; जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी तडाखा पाहायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उष्णतेची लाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने रत्नागिरीसह राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. काल मध्यरात्री रत्नागिरीत मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडला. याचा आंबा हंगामावर परिणाम होऊ लागला आहे.
गेल्या काही दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये हवामानात अचानक बदल दिसून आला आहे. काही ठिकाणी वादळी पाऊस, विजा पडल्या आणि गारपीटही झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मुंबई आणि परिसरात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय, या भागात उष्ण आणि दमट हवामानही जाणवू शकते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्यापासून राज्यात पावसाचे प्रमाण कमी होईल; मात्र तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील २ ते ३ दिवसांत काही भागांमध्ये तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. रत्नागिरीत काल आणि आज प्रचंड उष्मा जाणवत होता. नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. या दरम्यान मध्यरात्री विजेच्या गडगडाटासह तुरळक पाऊस झाला; परंतु आज पहाटेपर्यंत पावसाचे वातावरण होते. पाऊस आणि गडगडाट सुरू होता. त्यानंतर वातावरण बदलले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.