कोकण

परसबाग स्पर्धेत विजेत्या साळीस्ते शाळेचा सन्मान

CD

swt2310.jpg
39112
सिंधुदुर्गनगरी : पोषण शक्ती निर्माण प्रधानमंत्री उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या साळीस्ते नंबर १ शाळेला सन्मानित करताना शिक्षण सभापती प्रितेश राऊळ सोबत प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद हाजी अफरुद्दीन, जिल्हा परिषद सदस्य प्राची इस्वलकर.

परसबाग स्पर्धेत विजेत्या
साळीस्ते शाळेचा सन्मान
निकाल जाहीर : पोषण शक्ती निर्माण प्रधानमंत्री उत्कृष्ट परसबाग
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ : पोषण शक्ती निर्माण प्रधानमंत्री उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात विजेते ठरलेल्या शाळांचा जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी हा सन्मान सोहळा झाला. यावेळी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुखी अहमद हाजी अफरुद्दीन, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. एस. पाटील, सदस्य प्राची इस्वलकर, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, नितीन राऊळ, अपर्णा सातोसकर आदी उपस्थित होते. यावेळी त्या भागातील जिल्हा परिषद सदस्य, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, मुख्याध्यापक आणि मुले यांनी हा सन्मान स्वीकारला. यामध्ये कणकवली तालुक्यातील साळीस्ते नंबर १ शाळेने प्रथम क्रमांक, वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंढराचीवाडी पेंडूर या शाळेने तृतीय क्रमांक, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे शाळेने तृतीय क्रमांक, कुडाळ तालुक्यातील आंबडपाल शाळेने उत्तेजनार्थ प्रथम, मालवण तालुक्यातील सर्जेकोट मिर्याबांदा शाळेने उत्तेजनार्थ द्वितीय आणि देवगड तालुक्यातील पुरळ शाळेने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंढराचीवाडी पेंडूर शाळेच्या मुलांनी परसबाग भाजी यावर सुंदर गीत सादर करीत भाज्यांचे महत्त्व विषद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑपरेशन टायगर! महाराष्ट्रात राजकीय भूकंप? उद्धव ठाकरे गटाच्या ७ खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गुप्त बैठक?

प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार; सोमवारपासून कामगार संघटनेचे घंटानाद आंदोलन, २९ जूनपासून बेमुदत धरणे...

Simcard Safety : मोबाईलचं नेटवर्क अचानक गायब होतंय का? हॅक झालेलं असू शकतंय तुमचं सिमकार्ड, 'या' ट्रिकने लगेच करा चेक

Latest Marathi News Live Update : मोफत सोयाबीन बियाणे वाटपात गोंधळ; टोकन न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

Vijay Thalapathy Video Karnataka : मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत कर्नाटकातील टोलनाक्यावर घडली अचंबित घटना, देवदर्शनासाठी जाताना कार स्वतः चालवली

SCROLL FOR NEXT