कोकण

राजापूर :हर घर जलच्या मार्गात निधीचा अडसर

CD

(ग्राफीक पद्धतीने घ्यावे.)

-rat२३p६.jpg-
26O39103
राजापूर ः नळपाणी योजनेच्या विहिरीचे सुरू असलेले काम.
-------
‘हर घर जल’च्या मार्गात निधीचा अडसर
राजापुरातील १४१ गावांना प्रतीक्षा : ११२ कोटींचा आराखडा, २०५ पाणी योजनांची कामे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ : केंद्र शासनातर्फे ‘हर घर जल’ देणारी जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. तब्बल ११२ कोटी रुपयांच्या आराखड्यातून २०५ नळपाणी योजनांची कामे केली जात आहेत. आजपर्यंत तालुक्यातील ६४ महसुली गावे हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत. अजून १४१ गावांना हर घर जलची प्रतीक्षा आहे. सद्यःस्थितीमध्ये अंमलबजावणीतील दिरंगाईसोबतच पुरेशा निधीच्या बूस्टरअभावी जलजीवन मिशन योजनेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे अनेक योजना रखडल्याने तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा असह्य होणार आहेत.
गावोगावची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी संथगतीने सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीनंतर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रगती होणे अपेक्षित होते; मात्र तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा अधिक असह्य होणार आहेत.

*निधीच्या बूस्टरची प्रतीक्षा
जलजीवन मिशन योजनेसाठी मंजूर असलेल्या ११२.१२ कोटी पैकी ४३.७३ कोटी रुपये म्हणजे केवळ ३९ टक्के निधी खर्च झाला आहे. कामांच्या प्रगतीचा विचार करता ३६ कामे सध्या ७५ ते १०० टक्के प्रगतिपथावर आहेत. या कामांमध्ये किरकोळ पाईपलाईनसह मुख्यत्वे वीजजोडणीच्या कामांचा समावेश आहे. या कामांना निधीचा बूस्टर मिळाल्यास ती पूर्ण होणार आहेत; मात्र, गेल्या दोन वर्षामध्ये जलजीवन मिशन योजनेचा तालुक्याला निधी प्राप्त झालेला नसल्याने कामे पूर्ण कशी करायची? असा सवाल ठेकेदारांकडून उपस्थित केला जात आहे.

*दृष्टिक्षेपात
राजापुरातील जलजीवन मिशन योजना
एकूण मंजूर कामे असलेली गावे ः २०५
एकूण मंजूर निधी ः ११२.१२ कोटी
एकूण झालेला खर्च ः ४३.७३ कोटी
हर घर जल घोषित गावे ः ६४
‘नो डिमांड’ असलेली गावे ः ८


* योजनेच्या कामांची प्रगती
७५-१०० टक्के प्रगतिपथावर कामे ः ३६
५०-७५ टक्के प्रगतिपथावर कामे ः ४६
२५-५० टक्के प्रगतिपथावर कामे ः ३८
०-२५ टक्के प्रगतिपथावर कामे ः ५


*हर घर जल घोषित झालेली गावे
शिवणेखुदर, बुरंबेवाडी, बाकाळे, दसूरवाडी, पोकळेवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, निवेली, तेरवण, थोरलीवाडी, साखर, येरडव, गोठीवरे, कारवली, कशेळी-वरचीवाडी, दसूर, कोंभे, सागवे-पालये, खिणगिणी, जैतापूर-बाजारवाडी, सौंदळ-मुसलमानवाडी, नाणार-वाडीचिवारी, कुंभवडे-हरचलेवाडी, कुंभवडे, डोंगर-दत्तवाडी, मठखुदर्, सोलगाव, कुवेशी-तुळसुंदेवाडी, वाडावेत्ये, गोठणेदोनिवडे, वावूळवाडी, बारसू, भाबलेवाडी, निखरेवाडी, कोदवली-मांडवकरवाडी, मोगरे, केरावळे, सागवे जांभारी, देवीहसोळ, कोंडसरबुद्रुक, बेनगी, वडदहसोळ-खालचीवाडी, पळसमकरवाडी, करेल, डोंगर-मुसलमानवाडी, परटवली.

*असे आहेत सरपंचांचे आक्षेप?
संभाव्य पाणीटंचाई आराखड्याच्या झालेल्या बैठकीमध्ये जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीवर सरपंचांनी प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले होते. पाच वर्ष झाली तरी काही गावांमध्ये नळपाणी योजनेची कामेच सुरू नाहीत. झालेली काही कामे निकृष्ट दर्जाची आहेत. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी-अधिकारी आणि ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेच्या नळपाणी योजनांचे आराखडे तयार केले असते तर तालुक्यामध्ये संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठक घ्यायची वेळ नसती, अशा शब्दामध्ये काही सरपंचांनी प्रशासकीय कारभारावर ताशेरे ओढले होते.

कोट
राजापूर तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर केल्या जात आहेत. निर्धारित कालावधीमध्ये जास्तीत जास्त नळपाणी योजनांची कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
--प्रशांत पवार, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : जग सोडताना त्याने जिवाभावाचा दोस्तही सोबत नेला ! प्रॉपर्टी डीलरने पाळीव कुत्र्यासह जीवन संपवले, बंद खोलीत आढळले मृतदेह

Nashik Highway News: पुणे–नाशिक महामार्गावरील पेठ, गायमुख, एकलहरे येथे अंडरपास-ओव्हरब्रिजला गडकरींची तातडीची मंजुरी

Pune Police Recruitment News: शेतकरी कुटुंबातील प्रणाली पाटीलची संघर्षातून पुणे शहर पोलीस म्हणून निवड; लाखणगाव परिसरातून कौतुकाचा वर्षाव

Pargaon Police News: काठापूर बुद्रुकमध्ये मेंढपाळ महिलेची सव्वातीन लाखांची कापडी पिशवी ४८ तासांत शोधून पोलिसांनी परत केली

MI vs CSK Live: सर्वात मोठी बातमी; रोहित शर्मा, MS Dhoni ला वानखेडेवर खेळताना पाहण्यासाठी जाताय, मग हे नक्की वाचा...

SCROLL FOR NEXT