कोकण

विक्रांत सावंत यांचे भविष्य उज्वल

CD

swt2316.jpg
39143
सावंतवाडी ः विक्रांत सावंत यांचा सत्कार करताना संजू परब, बबन साळगावकर व इतर मान्यवर.

विक्रांत सावंत यांचे भविष्य उज्वल
संजू परबः सावंतवाडी ‘आरपीडी’मध्ये सत्कार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः विक्रांत सावंत यांचा स्वभाव आणि समाजाप्रती असलेला त्यांचा आदर पाहता त्यांची प्रगती निश्चित असून त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. (कै.) विकास सावंत यांना अपेक्षित असलेले काम त्यांच्या हातून निश्चितपणे घडेल, असा विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब त्यांनी व्यक्त केला.
​माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन शिक्षण व कृषी समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा गौरव करण्यात आला. राणी पार्वती देवी हायस्कूल येथे आयोजित या सोहळ्यात संजू परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत आदी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनीही सावंत यांना शुभेच्छा दिल्या. (कै.) भाईसाहेब सावंत व (कै.) विकास सावंत यांचा वारसा विक्रांत यांना लाभला असल्याचे सांगत, त्यांनी (कै.) अजित पवार यांच्या कामाचा धडाका आदर्श मानून जनसामान्यांसाठी कार्य करावे, पुढच्या निवडणुकीत प्रचाराला जाण्याची गरज भासणार नाही, इतके मोठे काम करून जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अमोल सावंत, वसुधा मुळीक, प्रा. केदार म्हसकर, दशरथ शृंगारे व अन्य प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना विक्रांत सावंत यांनी आपल्या विजयाचे श्रेय ज्येष्ठांचे आशीर्वाद, मतदारांचे प्रेम आणि कुटुंबाची पुण्याई यांना दिले. आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीच होईल, अशी ग्वाही दिली. प्रा. रूपेश पाटील यांनी विक्रांत सावंत यांची प्रकट मुलाखत घेतली. कार्यक्रमाला सोनाली सावंत, के. टी. परब, नारायण देवरकर, वसुधा मुळीक, सीमा मठकर, संप्रवी कशाळीकर, डॉ. सुमेधा नाईक-धुरी, नामदेव मुठे, जगदीश धोंड, मेघःश्याम काजरेकर, अर्चना सावंत उपस्थित होते. प्रास्ताविक संप्रवी कशाळीकर यांनी, सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले. डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT