कोकण

समाजात पुस्तकांना महत्त्वाचे स्थान

CD

swt2318.jpg
39149
दाणोली : जागतिक पुस्तक दिन कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ वाचक विजय बांदेकर यांच्या हस्ते झाले.

समाजात पुस्तकांना महत्त्वाचे स्थान
सुरेश आडेलकर ः दाणोली वाचनालयात पुस्तक दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः भारतीय समाजात पुस्तकाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ग्रंथाला आपण गुरू मानलेला आहे. पुस्तकाच्या वाचनातून अधिक ज्ञान प्राप्त होते. म्हणून वाचन संस्कृती वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुरेश आडेलकर यांनी केले.
समर्थ साटम महाराज वाचन मंदिर, दाणोली या संस्थेच्या वतीने जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे यांनी पुस्तक दिनाचे महत्त्व शालेय विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ते म्हणाले, ‘‘माणूस हा जन्मतःच ज्ञानी नसतो तर ते ज्ञान चांगल्या पुस्तकांच्या माध्यमातून आपणास मिळत असते. पुस्तके केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून माणसांच्या विचारांचे दार उघडण्याचे साधन आहे. मनाला दिशा देणारे व आयुष्य समृद्ध करणारे असे ज्ञान पुस्तकातूनच मिळत असते. म्हणून पुस्तकांची सोबत करा व आपले ज्ञान समृद्ध करा.’’
वाचनालयाचे सचिव डॉ. एल. डी. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. स्वाती नार्वेकर, विजय बांदेकर, सुरेश आडेलकर, गिरीधर चव्हाण, ग्रंथपाल दीपा सुकी, नीता मिस्त्री, जयश्री कोरगावकर, किरण केंगार आदी उपस्थित होते.
यावेळी शालेय मुलांनी पुस्तकांबाबत आपले मत व्यक्त केले. शालेय मुलांना व वाचकांना ‘आरती’ अंक भेट देण्यात आले. आजच्या कार्यक्रमावर आधारित शालेय विद्यार्थ्यांनी ‘मी पाहिलेले ग्रंथालय’ किंवा ‘आज मी काय ऐकले’ यावर दहा ओळीचा निबंध लिहिला. विजेत्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जातील. प्रास्ताविक भरत गावडे यांनी केले. प्रगती परांजपे-मुजुमदार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT