-rat२३p१३.jpg-
26O39125
आर्यन धुळप
--------
बुद्धिबळमध्ये आर्यन धुळपचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : रत्नागिरी येथील आर्यन धुळप या बुद्धिबळपटूने मागील काही कालावधीत विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश प्राप्त केले आहे.
कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आर्यनने सात फेऱ्यांमध्ये पाच गुणांसह खुल्या गटात पारितोषिक प्राप्त केले. तसेच सांगली येथे पार पडलेल्या खुल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वोत्तम द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. त्या आधी रत्नागिरीत झालेल्या (कै.) रामचंद्र सप्रे स्मृती राज्य अमॅच्युअर अजिंक्यपद क्लासिकल फिडे मानांकन स्पर्धेत आर्यनने १४२९ इतके क्लासिकल फिडे गुणांकन प्राप्त केले. आर्यनने दहावीची बोर्ड परीक्षा दिली. परीक्षेच्या तयारीत असताना अभ्यास सांभाळून विविध बुद्धिबळ स्पर्धांत सहभागी होत यश प्राप्त केल्याबद्दल त्याचे विशेष कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.