कोकण

प्रवासी बोट सेवा तत्काळ नियमित करा

CD

किनारपट्टीवरील प्रवासी बोट सेवा
नियमित करण्याची मागणी
''हिंदू जनजागृती''तर्फे सुराज्य अभियानचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः कोकण किनारपट्टीवरील प्रवासी बोट सेवा नियमित व सुरळीतपणे सुरू ठेवण्याची हिंदू जनजागृती समितीच्या ''सुराज्य अभियान''ची मागणी आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. याबाबत डॉ. रविकांत नारकर यांनी माहिती दिली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोकण किनारपट्टीवरील बंद असलेली प्रवासी बोट सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, रामनवमीच्या पूर्वसंध्येपासून ही सेवा अचानक बंद झाल्याचे समजते. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोकणवासीयांच्या दृष्टीने ही सेवा सुरू असणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे प्रामुख्याने स्थानिक लोकांसाठी सुरू झाली असली तरी सध्या तिथे स्थानिक प्रवाशांसाठी पुरेशा गाड्या उपलब्ध नाहीत. बहुतांश गाड्या उत्तर ते दक्षिण भारताला जोडणार्‍या लांब पल्ल्याच्या आहेत, ज्यामुळे स्थानिकांना आरक्षण मिळणे कठीण होते. कोकणातील रस्ते घाट आणि वळणावळणाचे असल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात इंधन खर्च होते. सागरी प्रवास हा सरळ आणि विना अडथळा असल्याने इंधनाची मोठी बचत होते. रस्ते वाहतुकीच्या तुलनेने सागरी वाहतूक स्वस्त असते. कारण यासाठी रस्ते किंवा पुलांच्या बांधकामावर वारंवार खर्च करावा लागत नाही. रस्ते वाहतुकीपेक्षा सागरी वाहतूक किफायतशीर असते. विज्ञानाच्या नियमानुसार पाण्यात वस्तूचे वजन तुलनेने कमी भासते. परिणामी कमी ऊर्जेत आणि खर्चात जास्त वाहतूक शक्य होते. कोणतीही नवीन सेवा लोकप्रिय होण्यासाठी किमान ६ महिने ते १ वर्ष ती सातत्याने सुरू राहणे आवश्यक असते. त्याशिवाय लोकांमध्ये विश्वास निर्माण होत नाही आणि प्रवाशांची संख्या वाढत नाही. त्यामुळे ''प्रवासी मिळत नाहीत'' या कारणास्तव सेवा बंद करणे अन्यायकारक आहे. सद्यस्थितीत रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण आहे. कोकणच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी ही स्वस्त व नियमित सागरी सेवा पुन्हा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

MI vs CSK Live : संजू सॅमसनचे खणखणीत शतक! मुंबई इंडियन्सवर पडला भारी, IPL 2026 मधील 'Chetta'ची दुसरी Century

US Iran Tensions : युद्ध पुन्हा भडकणार? हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी उडवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

SCROLL FOR NEXT