रुग्णालयात धिंगाणा
घालणाऱ्यावर गुन्हा
संगमेश्वर ः एका मद्यपीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात धुमाकूळ घालत वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत शांततेचा भंग करणाऱ्या आणि डॉक्टरांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणाऱ्या रवींद्र भागोजी जाधव याच्यावर संगमेश्वर पोलिसांनी आता कायद्याचा बडगा उगारला आहे. २२ एप्रिलला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रवींद्र याने दारूच्या नशेत बरळत ग्रामीण रुग्णालयाचा परिसर डोक्यावर घेतला. मोठमोठ्याने आरडाओरडा करत आणि विचित्र हातवारे करत धिंगाणा घातला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजित अनंत मोरे यांनी त्याला समजावण्याचा आणि आवरण्याचा प्रयत्न केला असता, त्याने डॉक्टरांशीच हुज्जत घालून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याबाबत डॉ. मोरे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली. संगमेश्वर पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.