कोकण

बेळणे येथील अपघातात कुटुंबातील चौघे जखमी

CD

बेळणे येथील अपघातात
कुटुंबातील चौघे जखमी
महामार्गावर ट्रकची मोटारीला धडक

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ : मुंबई-गोवा महामार्गावर बेळणे येथे मोटार आणि ट्रक यांच्यातील धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले. जखमींमध्ये नऊ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. जखमींना तातडीने कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
अपघातात बांदा येथील सुहास सहदेव माधव (वय ३७), सुशांत सहदेव माधव (३५), स्वरा सुहास माधव (३२), रामचंद्र सुहास माधव (९) जखमी झाले. बांदा येथील माधव कुटुंब मोटारी (एमएच ०७ एएस २१४९) ने मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होते. पहाटे सव्वाचारच्या सुमारास त्यांची मोटार बेळणे परिसरात आली असता, एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मोटारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नांदगाव येथील जगद्‌गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिका चालक अमोल तेली यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: युद्धाच्या तणावात सोन्याचे भाव कोसळले! उच्चांकापासून 35,000 तर दोन दिवसांत 8 हजारांनी स्वस्त; आजचे ताजे दर पाहा

Ozar Shirdi Road: ओझर-शिर्डी मार्ग रुंदीकरणाला २१३ कोटींची मंजुरी, कुंभमेळा निधीतून होणार काम; वाहतूक, पर्यटन आणि कृषी अर्थव्यवस्थेला मिळणार नवे बळ

Kolhapur Engineer End Life : वडिलांचा कारखाना, भाऊ परदेशात नोकरीला; एम.टेक विशालचा टोकाचा निर्णय, MIDC रोडवर धक्कादायक घटना

Maharashtra Agriculture Universities : तब्बल 23 वर्षांनंतर मोठा निर्णय! महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठांसाठी 3,723 पदांच्या मेगा आकृतीबंधाला मंजुरी

Latest Marathi News Live Update : शिर्डीच्या साई संस्थानचा कारभार सात वर्षांपासून विश्वस्त मंडळाविना

SCROLL FOR NEXT