मिरज : आरग (ता. मिरज) येथे शेतजमिनीच्या रस्त्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत दोघेजण गंभीर जखमी झाले असून एका चारचाकी वाहनाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणाची नोंद मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.