कोकण

वाफोली माऊली पंचायतन मंदिर पुन:प्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ

CD

swt2322.jpg
39214
वाफोली : येथील श्री देवी माऊली मंदिर.

वाफोली माऊली पंचायतन मंदिर
पुन:प्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ
भाविकांची अलोट गर्दी : आज मुख्य सोहळा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ : वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा भव्य ''पंचकुंडी पुन:प्रतिष्ठापना सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरु आहे. गेले तीन दिवस विविध धार्मिक विधी, होमहवन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात निमित्त गावात चैतन्यमय वातावरण असून माहेरवाशीणी व चाकरमानी यांची लक्षणीय उपस्थिती आहे.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी २१ एप्रिल रोजी सकाळी यजमानांची शरीरशुद्धी व प्रायश्चित्त विधी संपन्न झालेत. तसेच गाऱ्हाणे, प्रधानसंकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, संभारदान, वर्धिनीपुजन, प्राकारशुद्धी, गणेशयाग, पंचकुंडी मंडप प्रतिष्ठा आणि श्री देवी माऊली पंचायतन परिवारातील देवांचा जलाधिवास, कौतुकबंधन, आरती व तीर्थप्रसाद असे कार्यक्रम पार पडले. २२ रोजी सकाळी मंगलाचरण, प्राकारशुद्धी, सर्वमूर्तिना स्थान विधी, ब्रह्मादि मंडल देवता पूजन, मूर्तिचा शय्याधिवास, योगिनी, वास्तू, भैरव, क्षेत्रपाल मंडल देवता पूजन, अरणी मंथापूजन, अग्नी उत्पत्ती, अग्नी स्थापना, ग्रह मंडल देवता पुजन, अन्वाधान, वास्तू, ग्रहयजन, लघुपूर्णाहुती आणि तीर्थप्रसाद असे विधी संपन्न झाले. गुरुवारी २३ रोजी सकाळी मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, अग्नीपुजन, पर्यायहोम, मुख्य देवतासाठी हवन आणि लघुपूर्णाहुती तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम झालेत. २४ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहीत देवता पूजन, तत्वहोम आणि आवाहित मंडल देवतांसाठी हवन करण्यात येईल. सकाळी १०.२६ ते ११.११ या शुभ मुहूर्तावर श्री देवी माऊली पंचायतन देवता पुन:प्रतिष्ठापना तत्त्व न्यास, प्राणप्रतिष्ठा, महापूजा, प्रायश्चित्त होम, बलिदान पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वाद आणि महानैवेद्य होणार आहे. दुपारी १२.३० वा. महाआरती व महाप्रसाद होईल. श्री माऊली परिवार देवातांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थान समितीने ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्तम नियोजन केले आहे. या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती वाफोली, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था (मुंबई) व वाफोली ग्रामस्थ यांनी सर्व भाविकांनी या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT