‘वैद्यकीय परिषदे’साठी रविवारी मतदान
मनुज जिंदल; केंद्रात मोबाईल, कॅमेरा नेण्यास मनाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबईची निवडणूक रविवारी (ता. २६) होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील शरीररचना शास्त्र विभाग खोली क्र.१ आणि २ अशी दोन मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रात मोबाईल, कॅमेरा, वायरलेस संच नेण्यास मनाई असून, मतदारांना ओळख पटवण्यासाठी खालील नमूद पुरवण्यापैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो आयडीप्रूफसह सादर करावा लागणार आहे, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळवले आहे.
निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५५६ मतदार आहेत. ही निवडणूक एकूण ६० उमेदवार लढवत असून, त्यापैकी ९ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील नावासमोरील चौकटीत एक्स करून ९ उमेदवारांना मत देण्याचे आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभाग, तळमजला खोली क्र.१ आणि २ अशी दोन मतदार केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. पहिल्या केंद्रात १ ते २८०, २८१ ते ५५६ मतदारांसाठी दुसरे मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. मतदारांना आपली ओळख पटवण्यासाठी पुढील पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो ओळखपत्र पुराव्यासह सादर करावा लागणार आहे.